-
पुणे : लॉकडाउनशिथील झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर लोक सातारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. पुणे-सातारा महामार्गावर बुधवारी पोलीस अशा नागरिकांची कसून तपासणी करण्यात आली. (सर्व छायाचित्रे – पवन खेंगरे)
-
यामध्ये कोणी अवैधरित्या तर प्रवास करीत नाही ना याची पोलिसांकडून खातरजमा केली जात होती.
-
महामार्गावर नीरा नदीवरील सारोळा या गावाजवळच्या पुलावर पुणे-सातारा या जिल्ह्यांची सीमारेषा आहे, तिथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती.
-
पोलिसांकडून प्रत्येक नागरिकाची कसून चौकशी केली जात होती. तसेच या नागरिकांची करोनाची लक्षण तपासण्यासाठी स्वतंत्र मेडिकल चेकअपची व्यवस्था करण्यात आली आहे.
-
तपासणीनंतर प्रत्येक नागरिकाच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात आले.
-
तपासणी सुरु असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
-
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने लोक आपल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून सामानाच्या मोठ्या लवाजम्यासह प्रवास करताना दिसून आले.
-
मालवाहतुकीला परवानगी असल्याने मोठ्या प्रमाणावर ट्रक आणि कंटेनर यांची देखील महामार्गावर गर्दी झाली होती.
-
जिल्हाबंदी असल्याचा बोर्डही या मार्गावर लावण्यात आला आहे. मात्र, प्रवेशाचा विशेष परवानगीचा पास असेल तरच जिल्ह्यात प्रवेश करता येत आहे.
-
राज्य शासनाने जिल्हा प्रवेशावेळी नागरिकांसाठी घालून दिलेली कर्तव्ये आणि मार्गदर्शक सूचना दाखवताना आरोग्य कर्मचारी.

IND vs SL: याला म्हणतात कॅप्टन! सूर्यादादाने सामना सुरू असताना खेळाडूंना पाहा काय सांगितलं होतं? विजयानंतर झाला खुलासा