-
करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांनाही बसला आहे. एरवी पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाणाऱ्या महाबळेश्वरकडे जाणारा रस्ता सध्याच्या काळात असा सुमसान आहे. ( सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
लॉकडाउन काळात सर्व व्यवहार ठप्प असल्यामुळे महाबळेश्वरचा आर्थिक कणा मोडून पडला आहे.
-
पर्यटकच नसल्यामुळे बोट मालकांना काहीही काम उरलेलं नाही.
-
घोड्याचे मालकही मोबाईलवर टाईमपास करत आपला दिवस घालवतात.
-
एरवी पर्यटनासाठी येणारी लोकं महाबळेश्वरला आलं की घोडेसवारीचा आनंद जरुर घेतात.
-
गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ या भागातली सर्व छोटी-मोठी दुकानं बंद आहेत. पर्यटनासाठी येणारी लोकं हाच त्यांचा प्रमुख आधार होता.
-
कधीकधी स्थानिक लोकांची तुरळक गर्दी इकडे दिसते…
-
ती सोडली की बाकी पूर्णवेळ महाबळेश्वर असं निर्मनु्ष्य असतं.
-
बाजारपेठेलाही या काळात अवकळा आली आहे.
-
इथल्या लोकांची सकाळही आजकाल निवांत असते..
-
पहाटेच्यावेळी महाबळेश्वर परिसरातलं दृष्य
-
मॉर्निंग वॉकला बाहेर पडणं अनेकांना आवडतं…पण यंदा पर्यटकच नसल्यामुळे इथल्या रस्त्यांनाही चुकल्यासारखं वाटतंय.
-
दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडलेले स्थानिक
-
महाबळेश्वरमधीळ माळरानावर पहाटेच्या वेळचं विहंगम दृष्य
-
लॉकडाउनमध्ये कोणताही व्यक्ती अवैधरित्या शहरात प्रवेश करणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
-
शहरात प्रवेश करण्यासाठी ६ एन्ट्री पॉईंट आहेत.
-
प्रत्येक भागावर स्थानिक आणि पोलिसांचा पहारा असतो.
-
येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी केल्याशिवाय त्यांना आत सोडलं जात नाही.

IND vs PAK: वर्षानुवर्षांची परंपरा मोडली? आधी हस्तांदोलनास नकार अन् आता…; पाकिस्तानविरूद्ध फायनलपूर्वी भारताचा मोठा निर्णय