-
चीन आणि नेपाळने आगळीक केल्यानंतर भूताननेही भारताविरोधात दंड थोपटले असल्याची चर्चा गुरुवारी रंगली होती. (सर्व फोटो सौजन्य – Tshering Namgyel फेसबुक )
-
भूतानने भारताला मिळणारं पाणी रोखलं असल्याचं वृत्त देण्यात आलं आलं होतं.
-
यासोबत करोनाच्या पार्श्वभूमीवर भूतानने परदेशी नागरिकांना देशात प्रवेश बंद केला असून यामध्ये भारतीय शेतकरी असल्याचीही चर्चा होती.
-
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बक्सा येथील शेतकरी आंदोलन करत आहेत. सोमवारी आंदोलकांनी रोगिंया-भूतान रस्ता अडवला होता.
-
केंद्र सरकारने भूतानसमोर हा मुद्दा उपस्थित करावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती.
-
पण एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, भूतानने आसामला जाणारं पाणी रोखलं असल्याचं वृत्त चुकीचं असून यामध्ये सत्य नाही.
-
भूतानने आसामला जाणारं पाणी रोखलं असल्याचं वृत्त चुकीचं असून यामध्ये सत्यता नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
-
याउलट आसामला मिळणाऱ्या पाण्याचा प्रवाह जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी वाहिन्यांमध्ये दुरुस्ती करण्याचं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
-
भूतानमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याचे फोटो तेथील नागरिकाने फेसबुकवर शेअर केले आहेत.
-
गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन, उपविभाग प्रशासन, महापौर कार्यालय, कोविड टास्क फोर्सचे सदस्य, सरकारी सेवकांचे स्वयंसेवक, भूतानतील स्थानिक समुदायांचे सदस्य सगळं काही सुरळीत व्हावं यासाठी मेहनत घेत आहेत.
-
सतत पाऊस पडत असल्याने डोंगर परिसरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे.
-
यामुळे भूतानमधील सरकारी यंत्रणा पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे.
-
भारतीय मित्र आमची समस्या समजून घेतील अशी अपेक्षा भूतानने व्यक्त केली आहे.
-
आसामच्या बक्सा जिल्ह्यातील २६ पेक्षा जास्त गावांमधील जवळपास सहा हजार शेतकरी शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याकरिता डोंग प्रकल्पावर निर्भर आहेत.
-
१९५३ पासून शेतकरी सिंचनासाठी भूतानमधील नद्यांच्या पाण्याचा वापर करत आहेत.
-
शेतीची कामं सुरु झाल्यानंतर प्रत्येक वर्षी शेतकरी भारत-भूतान सीमेवर जाऊन नदीचं पाणी आसामला मिळेल याची व्यवस्था करतात.
-
शेजारी असणाऱ्या भारतासोबत आपली मैत्री कायम ठेवण्यास आपण कटिबद्ध असल्याचं भूतानने सांगितलं आहे.

IND vs PAK: वर्षानुवर्षांची परंपरा मोडली? आधी हस्तांदोलनास नकार अन् आता…; पाकिस्तानविरूद्ध फायनलपूर्वी भारताचा मोठा निर्णय