-
करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका महाराष्ट्रात अनेक शहरांना बसला आहे, यात पुण्याचाही समावेश आहे. प्रत्येक दिवशी पुण्यात पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. (सर्व छायाचित्र – अरुल होरायझन)
-
विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठीही काही नियम घालून दिले आहेत. जवळचे मोजके नातेवाईक वगळता अन्य कोणत्याही व्यक्तीला अंत्यसंस्काराच्या ठिकाणी परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तींना अखेरचा निरोप देतानाही नातेवाईंका संघर्ष करावा लागत आहे.
-
पुण्यात बुधवारी ७६ वर्षीय ख्रिश्चन धर्मीय व्यक्तीने करोनाशी लढताना आपले प्राण गमावले, हडपसर येथील Christian cemetery मध्ये या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
पुण्यातील अल्फा अँड ओमेगा या सामाजिक संस्थेने ख्रिश्चन धर्मातील रिती-रिवाजानुसार या रुग्णाच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात मदत केली.
-
यावेळी मृत व्यक्तीचे नातेवाईक व इतर व्यक्तींना पीपीई किट घालून प्रवेश देण्यात आला.
-
विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अंत्यसंस्काराच्या वेळी पीपीई किट घालणं बंधनकारक करण्यात आलंय.
-
अंत्यसंस्काराचे विधी पार पाडण्यासाठी ख्रिश्चन धर्मगुरुंची ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली होती.
-
तसेच मृत व्यक्तीच्या नातेवाईंकाना आपल्या आवडत्या व्यक्तीला अखेरचा निरोप देण्यासाठी सोशल मीडियावर थेट प्रक्षेपणाचीही सोय या संस्थेने केली होती.
-
सर्व विधी पार पडल्यानंतर मग आपल्या आवडत्या व्यक्तीला शेवटचा निरोप देण्याची तयारी सुरु होते.
-
सर्व रिती-रिवाजांचं पालन करुन येथील कर्मचारी काम करत असतात.
-
करोनामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक जणांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
-
अखेरचा निरोप देताना नातेवाईकांचे डोळे भरुन येतात…
-
पण भावनांवर आवर घालत, अखेरचा नमस्कार करत पुन्हा आपलं घर गाठणं गरजेचं असतं, कारण सध्याचा काळच खडतर आहे

“पैशांनी भरलेली बॅग, हातात सिगारेट”, राऊतांकडून शिरसाटांचा VIDEO शेअर; म्हणाले, “IT च्या नोटिशीनंतर…”