-
महाराष्ट्रात एकीकडे ठाणे, पुणे, औरंगाबादसारख्या शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर केला जात असताना मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे. (संग्रहित)
-
इकबाल चहल यांनी मुंबईत पुन्हा लॉकडाउन जाहीर करण्याची गरज नसल्याचं सांगितलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. संग्रहित (फोटो सौजन्य – बीएमसी)
-
“परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. हो दिवसाला जवळपास १२०० नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामध्ये ८० टक्के लोकांनी प्रवास केलेला आहे. इतर शहरांमधून ते मुंबईत आलेले आहेत,” अशी माहिती इकबाल चहल यांनी दिली आहे. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – निर्मल हरिंद्रन)
-
वसई-विरार, मीरा भाईंदर आणि मुंलुंड भांडूप यांच्या सानिध्यात असल्याने दहिसरच्या पश्चिम पट्ट्यात प्रभाव पडला असल्याचंही ते म्हणाले आहेत. जर हे वॉर्ड सोडलेतर दिवसाला फक्त ३०० नवे रुग्ण सापडत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
इकबाल चहल यांच्या म्हणण्यानुसार, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली यांच्याप्रमाणे मुंबईला लॉकडानची गरज नाही. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – प्रदीप दास)
-
“आपण चाचणीच्या सुविधा वाढवल्या आहेत. दिवसाला ६५०० पेक्षा जास्त चाचण्या केल्या जात आहेत. आम्ही १ जूनपासून निर्बंध शिथील केले आहेत. दिवसाला रस्त्यावर जवळपास १ कोटी लोक प्रवास करत आहेत. तरीही दिवसाला फक्त १२०० रुग्णांची नोंद होत आहेत. याचा अर्थ व्हायसरला चेस करण्याची आपली योजना यशस्वी ठरली आहे,” असं इकबाल चहल यांनी सांगितलं आहे. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
इकबाल चहल यांनी पुढील काही दिवसात पालिका केसेस दिवसाला ५०० ते १००० वर आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही सांगितलं आहे . संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)
-
मुंबई शहरात आपण महामारीवर नियंत्रण मिळवण्याच्या अगदी जवळ असून आर रेट (करोनाची लागण होण्याचा रेट) १.१ असल्याचं इकबाल चहल यांनी सांगितलं आहे. तांत्रिकदृष्ट्या सांगायचं गेल्यास १.० च्या खाली रेट गेल्यास महामारी संपली आहे. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
चहल यांनी दिवसाला १२०० रुग्ण सापडणे चिंताजनक नसून त्यामधील फक्त १५० ते २०० जणांमध्ये लक्षण दिसत असून त्यांना रुग्णालयात दाखल करत असल्याची माहिती दिली आहे. (संग्रहित)
-
प्रतिबंधात्मक उपाय, रुग्णसंपर्क शोध, संशयित रुग्णांवर लक्ष, मृत्यूचे प्रमाण, साप्ताहिक रुग्णवाढ, आरटी-पीसीआर चाचणी, जलद प्रतिजन चाचण्या, रुग्णांलयातील खाटांची स्थिती, अतिदक्षता विभागातील खाटांची सद्य: स्थिती, तेथील आरोग्य सुविधा, कृत्रिम श्वसन यंत्रणा इत्यादी माहितीचा समावेश असलेला अहवालही बैठकीत सादर करण्यात आला होता.
-
शेजारील शहरांबद्दल बोलताना चहल यांनी म्हटलं आहे की, “मुंबईत २२ हजार ऍक्टिव्ह केसेस असताना ठाण्यात ३२ हजार केसेस असणं चिंतेता विषय आहे. या शहरांनीही मुंबईप्रमाणे ‘चेस द व्हायरस’ धोरण स्विकारलं पाहिजे”. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – निर्मल हरिंद्रन)

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…