-
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (सर्व छायाचित्रे – सागर कासार)
-
हे दोन्ही उड्डाणपूल महापालिकेकडून उभारण्यात आले होते.
-
मात्र, त्यांची रचना चुकल्यामुळे मेट्रो मार्गिकेला अडथळा निर्माण होणार असल्याचे सांगत वाहतूक एकात्मिक आराखड्यानुसार मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपुलाची उभारणी नव्याने होणार आहे.
-
उड्डाणपूल तीन टप्प्यात पाडण्यात येणार असून टाळेबंदीच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
-
महापालिकेने उड्डाणपूल पाडण्याकरीता ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.
-
त्यानुसार उड्डाणपूल पाडण्यासाठी आवश्यक असलेले डंपर, जेसीबी आणि अन्य यंत्रांची जोडणी सुरु झाली आहे.
-
येत्या काही दिवसांत उड्डाणपूल पाडण्यास सुरुवात होईल.

Independence Day Wishes 2025: स्वातंत्र्य दिनाच्या ‘या’ खास मराठी शुभेच्छा प्रियजनांना पाठवा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा सुंदर HD PHOTOS