-
मुंबईमधील करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्य़ांवर पोहोचले असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५१ दिवस झाला आहे.
-
विविध उपाययोजनांमुळे संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात यश येत असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.
-
मुंबईच्या मानखुर्द भागात इंदिरानगर झोपडपट्टी वसाहतीत मोबाईल क्लिनीकमार्फत स्थानिकांची थर्मल स्क्रिनींग आणि औषध वाटप करण्यात आलं. (सर्व छायाचित्र – अमित चक्रवर्ती)
-
करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांचा शोध, त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करणे, घरोघरी जाऊन व फिरते दवाखाने, विशेष शिबिरांच्या माध्यमातून केली जाणारी तपासणी आणि चाचणी आदींमुळे करोनाबाधितांचा वेळीच शोध घेणे पालिकेला शक्य झाले आहे.
-
पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी २२ जून रोजी ‘मिशन झिरो’ अभियानाची घोषणा केली. त्यावेळी मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ३७ दिवस होता. १ जुलै रोजी तो ४२ दिवसांवर पोहोचला, तर १३ जुलै रोजी तो ५१ दिवस असा झाला.
-
१ जुलै रोजी करोनाबाधित रुग्ण वाढीचा सरासरी दर १.६८ टक्क्य़ांवर होता. तो आता १.३६ टक्के झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २२ जून रोजी ५० टक्के होते. ते आता ७० टक्क्य़ांवर पोहोचले आहे.
-
पालिकेकडून होणाऱ्या करोना चाचण्यांची दैनंदिन क्षमता पूर्वीच्या सरासरी चार हजार वरून आता सहा हजारापर्यंत वाढली आहे.
-
बाधित रुग्ण आढळण्याचे दैनंदिन सरासरी प्रमाण पूर्वी १,४०० होते. ते आता १,२०० पर्यंत खाली आले आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

Anna Hazare : ‘अण्णा आता तरी उठा….’, पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “९० वर्षांनंतरही…”