-
देशात करोनाने थैमान घातलं असताना पुढील काही महिन्यांमध्ये परिस्थिती अजून बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – निर्मल हरिंद्रन)
-
भारतात सध्या दिवसाला २५ हजाराहून अधिक रुग्ण सापडत असताना एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ९ लाखांच्या पुढे गेली आहे. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)
-
यादरम्यान IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरुने केलेल्या अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आला आहे. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
IISc ने दर्शवलेल्या अंदाजानुसार, सध्याचा ट्रेंड पाहता भारतात १ सप्टेंबरपर्यंत ३५ लाख करोनाबाधित रुग्ण असतील. म्हणजेच पुढील अडीच महिन्यात २६ लाख करोनाबाधित रुग्ण मिळतील. यावेळी संस्थेने एकट्या कर्नाटकमध्ये तेव्हा २.१ लाख रुग्ण असतील अशीही माहिती दिली आहे. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
IISc चे प्राध्यापक सुशीलकुमार जी, दीपक एस आणि त्यांच्या टीमकडून हा अभ्यास करण्यात आला आहे. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – प्रवीण खन्ना)
-
अभ्यासातील निष्कर्षानुसार, सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णसंख्या ६.३ लाख इतकी असेल. याशिवाय दिल्लीत २.४ लाख, तामिळनाडूमध्ये १.६ लाख आणि गुजरातमध्ये १.८ लाख इतकी असेल. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
अभ्यासात देण्यात आलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबरपर्यंत भारतात करानोचे १० लाख ऍक्टिव्ह रुग्ण असतील. तर कर्नाटकमध्ये ही संख्या ७१ हजार ३०० इतकी असेल.
-
भारतात आतापर्यंत करोनामुळे २४ हजार ३०९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
-
-
यानुसार भारतात सप्टेंबरपर्यंत १ लाख ४० हजार मृत्यू झालेले असतील. यामधील महाराष्ट्रात २५ हजार, दिल्लीत ९७००, कर्नाटकात ८५०० आणि तामिळनाडूत ६३०० आणि गुजरातमध्ये ७३०० मृत्यू झालेले असतील. संग्रहित (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”