-
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला असल्याने जिल्ह्यामध्ये आठवडाभर कडक लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. सोमवारपासून याला सुरुवात झाली असताना कोल्हापूर शहरासह जिल्ह्यांमध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. (सर्व छायाचित्रे – दयानंद लिपारे)
-
कोल्हापूर जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या अडीच हजाराकडे जात आहे. तसेच मृतांची संख्या ५५ झाली आहे.
-
अत्यावश्यक सेवा वगळता अन्य लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
-
सोमवारी सकाळी केवळ वृत्तपत्र, दूध यांचे वाटप झाले. ही कृती वगळता अन्यत्र लोकांचा वावर पूर्णत: थांबला होता.
-
कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरे मोठे शहर असलेल्या इचलकरंजीमध्ये लॉकडाउनला चांगला प्रतिसाद मिळाला.
-
उपनगरात काही लोकांचा असा वावर दिसून आला.
-
इचलकरंजीत विनाकारण फिरणाऱ्या लोकांना अडवून पोलीस चौकशी करीत होते. या औद्योगिक शहरात लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी सर्वत्र शांतता दिसून आली.
-
कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात शुकशुकाट.

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”