-
लॉकडाउन नियमांमध्ये शिथीलता आणल्यानंतर पुणे शहरात पुन्हा एकदा करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पहायला मिळाली. त्यामुळे प्रशासनाने शहरात पुन्हा एकदा लॉकडाउन घोषित केलं.
-
वैद्यकीय यंत्रणांनाही प्रत्येक नागरिकाची करोना चाचणी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पुण्याच्या वानवडी भागात नागरिकांची करोना चाचणी करण्यासाठी आरोग्य विभागाने कँपचं आयोजन केलं होतं. (सर्व छायाचित्र – अरुल होरायझन)
-
पुणे शहरात सोमवारी दिवसभरात करोनामुळे २९ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, १ हजार ८१७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले.
-
करोनावर उपचार घेणाऱ्या ८३० रुग्णांची तब्येत ठणठणीत झाल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे.
-
आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या २३ हजार ४४१ वर पोहचली असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.
-
पुणे शहरातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर चांगलाच ताण येत आहे. त्यातच प्रशासनाने पुन्हा जाहीर केलेल्या लॉकडाउमुळे नागरिक आणि व्यापारी वर्गामध्येही नाराजी आहे.
-
रुग्णांवर उपचार करता यावेत यासाठी प्रशासनाने शहरातील महाविद्यालयांची हॉस्टेल आपल्या ताब्यात घेऊन त्या जागेवर क्वारंटाइन सेंटर उभारायला सुरुवात केली आहे.
-
पुणे शहरातील लॉकडाउन आणि करोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्यामुळे यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये चांगलंच राजकारण रंगलेलं पहायला मिळालं.
-
करोनाग्रस्त रुग्णांना आयसीयूमध्ये बेड मिळत नसल्याचा आरोप भाजपाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
-
प्रशासनाच्या कामकाजात ताळमेळ नसून, लॉकडाउनमुळे आकडेवारी कमी झाली का असा सवालही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.
-
पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात अधिक लक्ष द्यावं अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे.
-
पुण्यातल्या वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालणं हे स्थानिक प्रशासनासमोरचं मोठं आव्हान आहे.
-
आतापर्यंत अनेक नागरिकांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत.

उद्धव ठाकरेंचा सवाल; “अंबादास दानवेंसारख्या कार्यकर्त्यासाठी मी भाजपाचे आभार मानतो, पण तुम्ही….”