-
देशभरात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका सणांनाही बसला आहे. गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे अनेकांच्या आनंदावर विरझण पडत आहे. परंतू करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे नियम पाळणंही तितकच गरजेचं आहे. बकरी ईदचा सण साजरा करण्यासाठीही सरकारने मार्गदर्शक सूचनांची घोषणा केली आहे. (सर्व छायाचित्र – अमित चक्रवर्ती)
-
बकरी ईदच्या वेळी मुस्लीम बांधवांनी नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, आपल्या घरीच अदा करावा.
-
सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. या नियमांमुळे मुंबईतील जनावरांचे बाजार आणि कत्तलखाने यंदा ओस पडले आहेत.
-
नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
-
प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निबंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”