-
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला अद्याप करोनाचा विळखा कायम आहे. अधिकाधिक लोकांची चाचणी व्हावी यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. (सर्व छायाचित्र – अमित चक्रवर्ती)
-
मुंबईत दररोज १ हजारच्या सरासरीनं रुग्ण आढळून येत असून, मुंबईतील एकूण रुग्णसंख्या १ लाख १३ हजारांवर गेली आहे.
-
मुंबईतील चाचण्यांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढवण्यात आली असून बुधवारी दिवसभरात १०,७३२ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १५ टक्के रुग्ण बाधित आढळले आहेत.
-
मुंबईत आतापर्यंत ५ लाख १६ हजारांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.
-
आतापर्यंत शहरात करोनामुळे ६ हजारापेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.
-
मुंबईत सध्या २०,२११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ होताना दिसत आहे.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट