-
अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेची राजधानी असणाऱ्या वॉशिंग्टन डीसीमध्येही हिंदू बांधवांनी आंनंदोत्सव साजरा केला. (फोटो सौजन्य: एएनआय)
-
विश्व हिंदू परिषदेच्या अमेरिकेतील कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे हातात घेऊन व्हाइट हाऊस समोरुन छोटी पदयात्रा काढली. यामध्ये लहान थोर सर्वचजण सहभागी झाले होते. (फोटो सौजन्य: एएनआय)
-
“आम्ही राम मंदिराच्या भूमिपूजनाचा जल्लोष साजरा करत आहोत. ४०० वर्षांच्या संघर्षानंतर आणि बऱ्याच मोठ्या बलिदानानंतर आज आम्हाला न्याय मिळाला आहे. आम्ही पंतप्रधानांचे आभारी आहोत,” असं मत वॉशिंग्टन डीसीमधील विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष महेंद्र सापा यांनी व्यक्त केलं आहे. (फोटो सौजन्य: एएनआय)
-
प्रभू रामचंद्रांचा फोटो असणारे बॅनर्स आणि फ्लेक्सही या रामभक्तांनी आणले होते. (फोटो सौजन्य: एएनआय)
-
गाड्यांमधूनही अनेकांनी जय श्री रामच्या घोषणा देत वॉशिंग्टनच्या रस्त्यावरुन फेऱ्या मारल्याचे दिसून आले.
Bihar Election Result 2025 Live Updates : बिहारमधील पराभवानंतर शशी थरूर यांचा काँग्रेसला घरचा आहेर; म्हणाले, “काँग्रेस पक्षानं अतिशय गंभीरपणे…”