-
पुण्यात करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी जंबो कोविड रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. (सर्व छायाचित्र – अरुल होरायझन)
-
CoEP कॉलेजच्या मैदानावर या जंबो रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.
-
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी या कामाचा आढावा घेतला.
-
अजित पवार आपल्या ताफ्यासमवेत…
-
शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता रुग्णांवर उपचारासाठी जंबो रुग्णालयाची गरज असल्याचं अजित पवारांनी बोलून दाखवलं होतं.
-
काही दिवसांपूर्वी पुण्यात या हॉस्पीटलच्या उभारणीसाठी लागणाऱ्या निधीवरुन चांगलंच राजकारण रंगलं होतं.
-
परंतू हा प्रश्न निकाली निघाल्यानंतर अखेरीस या हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात झाली आहे.
-
अधिकाऱ्यांकडून बांधकामाची माहिती घेताना अजित पवार…
-
यादरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व इतर अधिकारीही उपस्थित होते.
-
एकावेळी ८०० रुग्णांवर एकत्रित उपचार होण्याची सुविधा या हॉस्पिटलमध्ये असणार आहे.

दिवाळीआधीच ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशांची वाढ तर करिअर धरणार सुस्साट वेग