हिमाचल प्रदेशमधील सोलन येथील मुस्कान जिंदल या तरुणीनं अवघ्या २१ व्या वर्षी UPSC परीक्षेत झेंडा रोवला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात मुस्कानला ८७ वा रँक मिळाला. दररोज सहा ते सात तास अभ्यास करुन मुस्काननं पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केलं आहे. ज्या वयात महाविद्यालयात इतर तरुण-तरुणी मज्जा करतात त्याच वयान मुस्कान क्लास वन आधिकारी म्हणून काम पाहणार आहे. -
मुस्कान जिंदलचे वडील पवन जिंदाल हार्डवेयरचं दुकान चालवतात. मुस्कानला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. आई ज्योती घर सांभाळते. मुस्कानंचं प्राथमिक शिक्षणक बद्दी येथील व्हीआर पब्लिक स्कूलमध्ये झालं. दहावी आणि १२ मध्ये मुस्कानला ९६ टक्के गुण मिळाले होते. लहानपणापासूनच हुशार असणाऱ्या मुस्काने १२ नंतर बी. कॉमचं शिक्षण चंदीगड येथील एसडी कॉलेजमध्ये घेतलं. महाविद्यालयीन शिक्षण घेतनाच मुस्कानने आधीकारी व्हायचं ठरवलं आणि यूपीएससीचा अभ्यास सुरु केला होता. लाखो परिक्षार्थ्यांमध्ये मुस्काननं अव्वल १०० मध्ये क्रमांक पटकावत अनेकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी ट्विट करत या यशाबद्दल मुस्कानचं कौतुक केलं आहे. २२ वर्षीय मुस्कानचं सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. युपीएससीचा निकाल लागल्यानंतर मुस्कानच्या घरी अभिनंदन करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. २०१९ मध्ये दिलेल्या परिक्षेचा निकाल गेल्या आठवड्यात लागला होता. या परिक्षेत मुस्कान सर्वात कमी वयात आयएएस होणारी परिक्षार्थी ठरली आहे. -
(सर्व फोटो https://www.instagram.com/jindalmuskan6/ येथून घेतले आहेत.)

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…