पुणेकरांची करोनाशी झुंज सुरुच, एकाच दिवशी सापडले १ हजार २०४ रुग्ण
- 1 / 5
एकीकडे पुणे शहरात करोनाचे सर्व नियम पाळून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. परंतू काही केल्या शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात येण्याचं नाव घेत नाहीये. मंगळवारी पुण्यात करोनाचे १२०४ रुग्ण आढळले. (सर्व फोटो - आशिष काळे)
- 2 / 5
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोथरुड विभागात नागरी वसाहतीत स्वॅब सॅम्पल तयार करण्यासाठी कँपचं आयोजन केलं होतं. SNDT कॉलेजमध्ये या कँपचं आयोजन करण्यात आलं होतं.
- 3 / 5
पुणे शहरात मंगळवारी ४४ रुग्णांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.
- 4 / 5
आतापर्यंत पुणे शहरात २ हजार ७७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 5 / 5
करोनावर उपचार घेत असलेल्या १ हजारापेक्षा जास्त रुग्णांची तब्येत ठणठणीत झाली असून आतापर्यंत ६८ हजार ९०० रुग्ण करोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.