-
उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिंपरी येथे कोविड सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. ( सर्व फोटो : पवन खेंगरे )
-
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, आमदार मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
-
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना एक हजार रुपये दंड करण्याचा मानस असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सूचक वक्तव्य केलं आहे.
-
सर्वांनी मास्क वापरलाच पाहिजे. फिजिकल डिस्टसिंग ठेवलेच पाहिजे. हे सर्व नियम नागरिकांनी कटाक्षाने पाळले पाहिजेत,” असे आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केले आहेत.
-
या सहा मजली कोविड केअर सेंटरमध्ये ३१४ बेड आहेत.
-
शहरातील वाढत्या रुग्णसंख्येला आळा बसावा यासाठी स्थानिक महापालिका आणि आरोग्य विभाग कसोशीने प्रयत्न करत आहे.
-
करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात भव्य असे रुग्णालय उभारण्यात आले आहे.
-
देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला करोनाचा सर्वाधिक फटका बसला असून, राज्यातील करोना रुग्णांची वाढ दिवसेंदिवस वेगान होत असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत दिवसाला १४ ते १५ हजारांची भर पडत आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या सात लाखांच्या पुढे गेली असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
-
उपचारासाठी येणार्या रूग्णांना चांगले उपचार मिळाले पाहिजे. सध्याची वाढती रुग्ण संख्या ही चिंतेची बाब असून अधिकाधिक तपासण्या झाल्या पाहिजे, अशी मागणी देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसयांनी यावेळी केली.
-
चाचण्या वाढवूनच आपण स्थितीवर नियंत्रण मिळवू शकतो. लस विकसित होईपर्यंत आपल्याला करोना नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला परिश्रम घ्यावे लागतील,” असं फडणवीस म्हणाले.

९ सप्टेंबरला पितृपक्षात शुक्राचं गोचर ‘या’ ३ राशींसाठी ठरेल वरदान! अफाट पैसा तर घरात आनंदाचे वातावरण; जीवनात अखेर येईल प्रेम