-
करोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्याच्यावरील लसीबरोबरच रोगप्रतिकारक शक्ति व प्रतिपिंड (अँटीबॉडीज्) विषयीही संशोधन केलं जात आहे. जगभरात वेगवेगळ्या संस्था यावर संशोधन करत असून, प्रतिपिंडाविषयी (अँटीबॉडीज्) करोनामुक्त रुग्णांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. (प्रातिनिधीक छायाचित्र- इंडियन एक्स्प्रेस/रॉयटर्स)
-
करोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर शरीरात निर्माण झालेले प्रतिपिंड (अँटीबॉडीज्) हे चार महिने टिकतात असे दिसून आले आहे, हे प्रतिपिंड (अँटीबॉडीज्) कमी काळ टिकतात, असे मध्यंतरी सांगण्यात आले होते. त्यामुळे लस तयार केली तरी काही फारसा उपयोग होणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते पण आता हे प्रतिपिंड (अँटीबॉडीज्) टिकाऊ असतात, हे लक्षात आल्याने विषाणूवरील लस परिणामकारक ठरणार आहे. (Photo: Reuters)
-
आइसलँडमध्ये तीस हजार लोकांवर चाचण्या करण्यात आल्या असता. विषाणूला प्रतिकारशक्ती प्रणाली काय प्रतिसाद देते याचा अभ्यास करण्यात आला असून, प्रतिपिंड (अँटीबॉडीज्) चार महिने टिकतात, ही निश्चितच दिलासा देणारी बाब ठरली आहे. जर लशीमुळे नैसर्गिक प्रतिपिंडासारखेच प्रतिपिंड (अँटीबॉडीज्) झाले तर त्यामुळे काही महिने तरी करोनापासून संरक्षण मिळणार आहे.
-
हार्वर्ड विद्यापीठ व यूएस नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ या संस्थांनी म्हटले आहे की, करोना लशीमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीचा अंदाज आलेला नाही. हे संशोधन न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. (Photo: Reuters)
-
संग्रहित छायाचित्र
-
रेजजाविक येथील डी कोड जेनेटिक्स या संस्थेने म्हटले आहे की, हे प्रतिपिंड (अँटीबॉडीज्) चार महिने किंवा अधिक काळ टिकतात.
-
दुसरीकडे मुंबईतील जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या करोना झालेल्या कर्मचाऱ्यांवर एक अभ्यासपूर्ण संशोधन करण्यात आलं. करोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या शरीरात तयार झालेल प्रतिपिंड (अँटीबॉडीज्) ५० दिवसांपेक्षा अधिक काळ म्हणजे दोन महिन्यापेक्षा जास्त दिवस राहत नाही, या अभ्यासातून असं दिसून आलं होतं.
-
या अभ्यास अहवाल डॉ. निशांत कुमार यांनी तयार केला होता. कुमार यांनी या अभ्यासाविषयी सांगितलं की,'जेजे, जीटी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयातील ८०१ कर्मचाऱ्यांचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासात २८ लोकांची आरटी पीसीआर चाचणी घेण्यात आली होती, ज्यात ते पॉझिटिव्ह आढळून आले होते.
-
या चाचण्या एप्रिल महिन्याच्या शेवटी व मे महिन्याच्या सुरूवातील करण्यात आल्या होत्या. जून महिन्यात करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणात करोनातून बऱ्या झालेल्या २५ जणांच्या शरीरात प्रतिपिंड (अँटीबॉडीज्) आढळून आले नाहीत.
-
या अभ्यासाचा अहवाल 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसीन अॅण्ड पब्लिक हेल्थ'च्या सप्टेंबरच्या अंकात प्रकाशित केला जाणार आहे, असं कुमार यांनी सांगितलं.
-
जेजे रुग्णालयातील सिरो सर्वेमध्ये ३४ असे होते, जे तीन पाच आठवड्यांपूर्वीच आरटी-पीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आले होते. तीन आठवड्यांपूर्वी संसर्ग झालेल्या ९० टक्के लोकांच्या शरीरात प्रतिपिंड (अँटीबॉडीज्) आढळून आल्या होत्या. तर पाच आठवड्यांपूर्वी संसर्ग झालेल्या लोकांपैकी ३८.५ टक्के लोकांच्याच शरीरात प्रतिपिंड (अँटीबॉडीज्) आढळून आल्या होत्या, असं डॉ. निशांत कुमार यांनी सांगितलं.
-
भारतात लसीच्या चाचण्या सुरू असतानाच हॉगकाँगमध्ये दुसऱ्यांदा करोना झालेला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे प्रतिपिंडाचा (अँटीबॉडीज्) मुद्दा चर्चेत आला आहे. प्रतिपिंड (अँटीबॉडीज्) करोना होण्यापासून व्यक्तीचं संरक्षण करतात.
-
डॉ. निशांत कुमार यांनी जेजे रुग्णालय व एका फाऊंडेशनच्या सहकार्यानं काही कर्मचाऱ्यांवर प्रतिपिंड (अँटीबॉडीज्) पाहणी केली होती. ज्यात असं दिसून आलं की, प्रतिपिंड (अँटीबॉडीज्) कमी होत जातात.
-
"या पाहणीतील जे निष्कर्ष आहेत, त्यातून हे स्पष्ट होतंय की लसीच्या योजनेवर पुन्हा काम करण्याची गरज आहे," असं डॉ. कुमार यांनी सांगितलं.
-
लसीचा केवळ एक डोज नाही, तर अनेक डोज द्यावे लागतील, असं हा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यापूर्वीच्या एका अभ्यासात असं दिसून आलं होतं की लक्षणं नसलेल्या रुग्णांमध्ये प्रतिपिंडाचं (अँटीबॉडीज्) प्रमाण लक्षणं असणाऱ्या रुग्णांपेक्षा कमी असतं.

१५ सप्टेंबरपासून ‘या’ ४ राशींची तिजोरी पैशाने भरेल! शुक्राच्या गोचरामुळे वाढेल संपत्ती; लवकरच मिळेल चांगली बातमी…