-
पुणे शहराला अजुनही करोना विषाणूचा विळखा कायम आहे.
-
शहरात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. करोनामुळे मृत्यू पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांवर चांगलाच ताण येताना पहायला मिळतोय. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
पुण्यातील नऊ स्मशानभूमीमध्ये कोल्ड स्टोरेज केबिनची सोय करण्यात आली आहे.
-
अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्यामुळे मृतदेहाची हेळसांड होऊ नये यासाठी ही सोय करण्यात आली आहे.
-
करोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांचे अंत्यसंस्कार हे प्रशासनातर्फे पूर्ण केले जात आहेत. प्रादूर्भावाचा धोका लक्षात घेता परिवारातील फक्त एका व्यक्तीला अंत्यसंस्काराच्या वेळी हजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
-
अनेक ठिकाणी प्रशासनातर्फेच मृत पावलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत.
-
गुरुवारी पुणे शहराने करोनाबाधित रुग्णसंख्येत एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
-
गुरुवारी दिवसभरात १ हजार ७४६ नवीन रुग्ण आढळले असून २६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
-
आतापर्यंत पुणे शहरात २ हजाराहून अधिक लोकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
-
प्रत्येक दिवशी मृतांच्या संख्येत होणारी वाढ पाहता, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनाही चांगलाच ताण सहन करावा लागतो आहे.

आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल