-
मुंबईत महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी करोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. एखादा रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीत आता अधिक तीव्र होणार आहे. (सर्व छायाचित्रे – अमित चक्रवर्ती)
-
मुंबईच्या अनेक महत्वाच्या भागांमध्ये आजही महापालिकेकडून करोना चाचणी शिबीराचं आयोजन केलं जात आहे.
-
रविवारी पालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २५ हजाराहून अधिक व्यक्तींना शोधून काढलं आहे.
-
मुंबईत सुरुवातीच्या काळात संसर्ग वाढला तेव्हा झोपडपट्टय़ांमध्ये ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम राबवून ज्या पद्धतीने रुग्णांच्या जवळचे संपर्क शोधले गेले तशाच आक्रमक पद्धतीने इमारतींमध्येही अतिजोखमीचे संपर्क शोधा, असे निर्देश आयुक्तांनी दिले होते.
-
झोपडपट्टीत जसे एका रुग्णामागे १५ संपर्क असे प्रमाण ठेवण्यात आले होते तसेच प्रमाण इमारतीतील एका रुग्णामागेही ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
अनलॉकच्या काळात प्रशासनाने निर्बंध शिथील केल्यामुळे गेल्या काही दिवसांत शहरात रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. यासाठी महापालिकेतर्फे चाचण्यांच प्रमाणही वाढवण्यात आलंय.

“मी मुस्लीम आहे त्यामुळे…”, ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलल्याबद्दल अली गोनीची प्रतिक्रिया; म्हणाला, “कुराणमध्ये…”