-
होळींची बोंबाबोंब आणि रंगाची उधळण सुरू असतानाच महाराष्ट्रात करोनानं हळूच शिरकाव केला. राज्यातील पहिला करोना बाधित रुग्ण पुण्यात आढळून आला. त्यानंतर हळूहळू राज्यभर करोनाचा प्रसार होत गेला. पण, पुणे कायम चर्चेत राहिलं. मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा वाढत असून, करण्यात येत असलेल्या चाचण्यांमधून प्रत्येक १०० नागरिकांपैकी ३० पुणेकर करोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. (सर्व छायाचित्रे प्रातिनिधीक आहेत))
-
शहरातील करोना संसर्गामुळे सक्रिय बाधित रुग्णांची संख्या वाढत असून शंभर चाचण्यांमागे तीस करोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याचे चित्र आहे. सक्रिय बाधित रुग्णांचे प्रमाण तीस टक्क्यावर पोहोचले असून, उपचार घेऊन बरे होणाऱ्यांच्या प्रमाणात घट झाली आहे.
-
पुणे स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध होत असलेल्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. सक्रिय बाधित रुग्णांची वाढती संख्या शहरासाठी चिंताजनक ठरण्याची शक्यता आहे.
-
करोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेकडून चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. मार्च महिन्यात करोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतरही चाचण्यांचे प्रमाण मर्यादित होते.
-
जुलै अखेरपासून चाचण्यात वाढ झाली. सध्या दिवसाला सहा ते साडेसहा हजार चाचण्या होत आहेत. या चाचण्यांमधून प्रतिदिन दोन हजारांच्या आसपास बाधित रुग्ण आढळत आहेत.
-
चाचण्यातून बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत असल्यामुळे सक्रिय बाधित रुग्णांच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. सध्या सक्रिय बाधितांची टक्केवारी ३०.२ एवढी आहे.
-
रुग्णांच्या टक्केवारीत वाढ होत असताना करोना उपचारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही घटले आहे. ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांपर्यंत होते.
-
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही टक्केवारी कमी होण्यास सुरुवात झाली असून, उपचारामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ८८. ६ टक्के एवढे आहे.
-
१३ ते १९ ऑगस्ट या कालावधीत सक्रिय बाधित रुग्णांची टक्केवारी २०.१ एवढी होती. २० ते २६ ऑगस्ट या दरम्यान २२.९ टक्के सक्रिय बाधित रुग्ण होते.
-
२७ ते २ सप्टेंबर या कालावधीत २७.७ टक्के सक्रिय बाधित होते, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. (सर्व छायाचित्रे प्रातिनिधीक आहेत)

१५ सप्टेंबरपासून ‘या’ ४ राशींची तिजोरी पैशाने भरेल! शुक्राच्या गोचरामुळे वाढेल संपत्ती; लवकरच मिळेल चांगली बातमी…