-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल बोगद्याचं उद्धाटन करण्यात आलं असून आज फक्त माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही, तर हिमालच प्रदेशातील करोडो लोकांचाही गेल्या कित्येक दशकांची प्रतिक्षा संपली आहे असे कौतुगोद्गार त्यांनी काढले.
-
या बोगद्यामुळे मनाली आणि केलॉन्गमधील अंतर तीन ते चार तासांनी कमी होणार आहे.
-
भारताच्या युद्धनीती विषयक धोरणांमध्ये हा बोगदा महत्वाचा भाग ठरणार आहे. हा जगातील सर्वात मोठा बोगदा आहे.
-
यामुळे भारतीय लष्कराला पाकिस्तान आणि चीन सीमेपर्यंत सहज प्रवेश करता येणार आहे.
-
या बोगद्यामध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
-
अटल बोगदा हा हिमालयाच्या पीर पंजाल रेंजमध्ये समुद्र सपादीपासून १० हजार फुटांच्या उंचीवर आहे. या बोगद्यामुळे मनाली ते लेह हे अंतर ४६ किलोमीटर कमी झालं आहे.
-
या बोगद्यामध्ये आपात्कालिन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठीही बोगदा तयार करण्यात आला आहे. तसंच हा बोगदा मुख्य बोगद्याच्या आतच आहे.
-
आपात्कालिन परिस्थितीमध्ये संपर्क करण्यासाठी प्रत्येक १५० मीटरवर एक टेलिफोनची सुविधाही देण्यात आली आहे.
-
अटल बोगदा हा ८० किलोमीटर प्रति तास वेगाने दररोज ३ हजार गाड्या १ हजार ५०० ट्रकच्या बाहतुकीसाठी डिझाईन करणअयात आलं आहे. तसंच यामध्ये सेमी ट्रान्सवर्स व्हेंटिलेशन सिस्टम, एससीएडीए नियंत्रण अग्निशमन, अत्याधुनिक इलेक्ट्रो-मेकॅनिकल प्रणालीही देण्यात आली आहे.
-
या बोगद्यात प्रत्येक ६० मीटर अंतरावर फायर हायड्रेट सिस्टम देण्यात आला आहे. तसंच प्रत्येक २५० मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमॅऱ्याच्या मदतीनं घटनांची माहिती मिळवणारी यंत्रणाही देण्यात आली आहे.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग