-
करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी नवी मुंबईत महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घडना घडली. (सर्व फोटो सौजन्य – नरेंद्र वसकर)
-
मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी करोना आयसोलेशन वॉर्डमध्ये तोडफोड केली. यात व्हेंटिलेटर, डायलिसीस मशिन, पंखे व इतर साहित्याची मोठी नासधूस करण्यात आली.
-
यादरम्यान मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटमधील डॉक्टर, नर्स आणि सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की केली.
-
वाशी पोलीस ठाण्यात याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून मारहाण आणि तोडफोड करणाऱ्या ३ महिला आणि ३ पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
-
या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण तयार झालं होतं.
-
४८ वर्षीय व्यंकटेश सूर्यवंशी असं मृत रुग्णाचं नाव असून मंगळवारी संध्याकाळी त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. सूर्यवंशी यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली, परंतू इतर चाचण्यांचे अहवाल येणं बाकी होतं. परंतू यानंतर उपचारादरम्यान सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला.
-
ही बातमी समजताच त्यांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. मारहाण आणि तोडफोड करणाऱ्या नातेवाईकांच्या हातात चाकू, कट्टा अशी हत्यारं असल्याची माहिती हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांनी दिली.

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल