-
करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्याचा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेलं लॉकडाउन आता मागे पडलं आहे. गणपती, नवरात्रीपाठोपाठ आता दिवाळीचं स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
पुण्याच्या सदाशीव पेठेतील एन.एस.फडके चौकात रस्त्याच्या कडेला आकाश कंदील विकणाऱ्यांनी आपली दुकानं मांडली आहेत. आकाश कंदीलांमुळे या रस्त्याला एक वेगळंच चैतन्य प्राप्त झालंय.
-
प्लास्टिकच्या कंदीलांपासून, पर्यावरणपूरक कंदील अशी विविध रेंज इथे पहायला मिळते आहे. लॉकडाउन काळात या छोट्या व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. पण परिस्थितीशी झुंज द्यायची असेल तर नवी उमेद घेऊन उभं रहावंच लागतं. दिवाळीचा सण ही उमेद प्रत्येकाला देईल अशी सर्वांना आशा आहे.
-
या जोडप्याच्या चेहऱ्यावरचा आनंदच खूप काही सांगून जातोय…
-
इतर सणांप्रमाणे दिवाळी साजरी करण्यासाठीही सरकारने काही नियम आखून दिले आहेत. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता या नियमांचं पालन करुन सण साजरा करत सर्वांनी सरकारी यंत्रणांना मदत केल्यास लवकरच करोनावर मात करण्यात आपल्याला यश मिळेल यात काही शंका नाही.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा नवीन दावा, आता म्हणे “भारत-पाकिस्तान एकमेकांवर…”