भाग्यस्थानातून होणारी अमावास्या नवे संकेत देत आहे. १४ जानेवारी रोजी रवी मकर राशीत येत आहे. हा रवी दशमस्थानात गुरू आणि शनीच्या युतीत असेल. सप्ताहाच्या सुरुवातीला आळसदायक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. कामासाठी पळापळ होईल. उशिरा का होईना कष्टाचे चीज होईल. ठरवून ठेवलेल्या कामाला गती मिळेल. व्यापार, उद्योग-धंद्यातील रेलचेल वाढलेली असेल. व्यवहाराचे गणित पक्के जमेल. नोकरदार व्यक्तीने कामाच्या ठिकाणी जबाबदारीने वागावे लागेल. पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. आर्थिक परिस्थितीत बदल होतील. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक क्षेत्रात सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करा. कौटुंबिक वाद बाजूला ठेवा. एक मताने राहण्याचा प्रयत्न करा. आरोग्यतंत्र सांभाळा. >> शुभ दिनांक : १५,१६ >> महिलांसाठी : संक्रांतीचा सण मोठय़ा उत्साहाने साजरा कराल. १४ जानेवारी रोजी रवी मकर या राशीत भाग्यस्थानात येत आहे. चर राशीत गुरू शनी रवी असणार आहेत. तुमच्या अष्टमस्थानातून होणारी अमावास्या आध्यात्मिक गोष्टींची ओढ वाढवणारी ठरेल. व्यवसायात इतके दिवस वाट पाहत होता, ती संधी आता समोर येऊन उभी राहील. या संधीचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करा. वाढवलेल्या उत्पादनातून फायद्याचे प्रमाण उत्तम राहील. कर्मचारी वर्गाला वरिष्ठांचा पाठिंबा राहील. सुधारित गोष्टींचा कल वाढेल. आर्थिकदृष्टय़ा लाभ होईल. राजकीय क्षेत्रातील वर्चस्व कायम राहील. नातेवाईकांशी ठरवलेल्या कार्यक्रमाचे आयोजन योग्य पद्धतीने पार पाडाल. मानसिकदृष्टय़ा चलबिचल अवस्था कमी करा. आरोग्याच्या बाबतीत अंगावर दुखणे काढत बसू नका. >> शुभ दिनांक : १४, १५ >> महिलांसाठी : मकरसंक्रांतीसाठीची तयारी यशस्वी ठरेल. चंद्राचे भ्रमण षष्ठस्थानाकडून अष्टमस्थानाकडे होत आहे. अमावास्या प्रहरात शांत चित्त ठेवा. १४ जानेवारी रोजी रवी मकर राशीत तुमच्या अष्टमस्थानात प्रवेश करत आहे. भावनिक निर्णय घेणे टाळा. परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न राहू द्या. व्यावसायिकदृष्टय़ा बदल करू नका. मोठी गुंतवणूक करणे टाळा. उधार-उसनवारीचा व्यवहार करू नका. नोकरवर्गाने मानसिक ताण-तणाव न घेता कामाकडे लक्ष द्या. दोलायमान अवस्थेतून बाहेर पडा. वरिष्ठांचे म्हणणे ग्रा धरा. पशांच्या बाबतीत आहे त्यात समाधान माना. राजकीय क्षेत्रातील नावीन्यपूर्ण योजना फलद्रूप होतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची विचारपूस करा. जोडीदाराशी वादविवादाचे प्रसंग टाळा. प्रकृतीची काळजी घ्या. >> शुभ दिनांक : १५, १६ >> महिलांसाठी : संक्रांतीचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करा अमावास्या षष्ठस्थानातून होत आहे. इतरांची हुरहुर विनाकारण मनाला लावून घेऊ नका. १४ जानेवारी रोजी रवी मकर राशीत तुमच्या सप्तमस्थानात प्रवेश करत आहे. तेव्हा जोडीदाराच्या आकांक्षा पल्लवित होतील. व्यवसायात मोठे धाडस करू नका. नवीन गुंतवणूक थोडय़ा कालावधीने गुंतवा. कर्ज काढून भांडवलात वाढ करणे टाळा. रोखीचे व्यवहार करा. नोकरदार व्यक्तींनी अधिकारी वर्गाशी हुज्जत घालू नका. हिशोबाचे ताळतंत्र वेळच्या वेळी नोंद करून ठेवा. कागदपत्रांच्या दस्तऐवजांची काळजी घ्या. आर्थिकदृष्टय़ा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. सामाजिक क्षेत्रात मोजक्याच गोष्टींसाठी हस्तक्षेप करा. संततीचा प्रश्न सोडवताना नकारार्थी भूमिका टाळा. मानसिकदृष्टय़ा स्वास्थ्य जपा. आरोग्याचे पथ्यपाणी सांभाळा. >> शुभ दिनांक : १०, १४ >> महिलांसाठी : हळदीकुंकू समारंभ मोठय़ा उत्साहात साजरा कराल. अमावास्या कालावधीत उपासनेत मन रमेल. पंचमस्थानातील शुक्र, भाग्यस्थानातील मंगळ यांचा शुभ परिणाम मिळेल. सप्ताहात राशिपरिवर्तन झालेला रवी मकर राशीत १४ जानेवारीला षष्ठस्थानात येत आहे. खरेदी-विक्री व्यवहार जपून करा. मोठय़ा उद्योगधंद्यासाठी गुंतवणूक मात्र विचारपूर्वक करा. व्यापार-उद्योगात आमिष दाखवणाऱ्या व्यक्तींपासून लांब राहा. नोकरदार व्यक्तीने स्वत:ची बाजू सावरताना इतरांना त्रास होणार नाही याची दखल घ्या. वरिष्ठ व्यक्तींशी नम्रतेने बोलावे लागेल. आर्थिकदृष्टय़ा खर्चाचा जम बसवताना आवक लक्षात घ्या. सामाजिक माध्यमांचा योग्य कारणासाठी उपयोग करा. संततीविषयी गोड बातमी कळेल. धर्मपत्नीचा आदर करा. घरगुती स्तरावर ठरवलेल्या कार्यक्रमाचे नियोजन बदलू नका. शारीरिकदृष्टय़ा योगसाधनेला महत्त्व द्या. >> शुभ दिनांक : १०, १६ >> महिलांसाठी : सणासुदीच्या काळात मानसिक शांतता ठेवा. अमावास्येचा प्रहर सुखकर करण्याचा प्रयत्न कराल. मकर राशीतील रवी पंचमस्थानात १४ जानेवारी रोजी येत आहे. व्यवहाराचे गणित आता उत्तम जमेल. वस्त्रदालन, सुगंधित वस्तूचा व्यवसाय इत्यादी व्यवसायांची आवक वाढेल. स्वतंत्र व्यवसाय चालू करणे शक्य होईल. परिश्रमाचे मोल मिळेल. शासकीय कर्मचारी वर्गाला अधिकार प्राप्त होईल. अनपेक्षित घटना मनाला उभारी आणेल. इतरांसाठी केलेली धडपड यशस्वी होईल. धनदायक गोष्टींची वाढ होईल. सर्वागीण विकास साधण्यासाठी तुमची संवेदनक्षमता वाढेल. मित्रपरिवार मदतीला येईल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. नातेवाईकांशी कामानिमित्त संवाद साधल. मानसिक स्थिरता लाभेल. आरोग्याची काळजी घ्या. >> शुभ दिनांक : १४, १५ >> महिलांसाठी : मनासारखी खरेदी कराल. अमावास्या कालावधीत धार्मिक गोष्टींचा उत्साह वाढेल. चतुर्थस्थानात गुरू शनी मकर राशीत असून १४ जानेवारीला रवीसुद्धा मकर राशीत येत आहे. चतुर्थातील ग्रहांचे वास्तव्य परिवर्तन करणारे ठरेल. उद्योगधंद्यामधील संघर्ष कमी होईल. मागणी वाढल्याने उत्पादनातही वाढ होईल. व्यापारी क्षेत्रात यश मिळेल. व्यवसायात आजच्यापुरता विचार करू नका. पुढे व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनाने पाऊल उचला. नोकरदार व्यक्तीने मिळालेल्या संधीचे सोने करा. तुमच्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या. आर्थिकदृष्टय़ा झालेला बदल बचतीत वाढ करणारा ठरेल. सामाजिक क्षेत्रात समतोल राखणे चांगले जमेल. बोलण्यातील गोडी तुमचे घरगुती वातावरण बदलू शकते. आरोग्याचे तंत्र ठणठणीत असेल. > > शुभ दिनांक : १०, १६ >> महिलांसाठी : घरगुती कार्यक्रम योग्य रीतीने पार पाडाल. मानसिकदृष्टय़ा तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी अमावास्या प्रहरात घ्या. पराक्रमस्थानात रवी १४ जानेवारी रोजी प्रवेश करीत आहे. व्यावसायिकदृष्टय़ा चढ-उतार उत्तम राहील. अनेक योजनांतून प्रयत्न यशस्वी होतील. मोठय़ा व्यापारी क्षेत्राचासुद्धा प्रगतीकडे कल असेल. स्थिर अवस्था यायला आता वेळ लागणार नाही. त्यामुळे मोठा उत्साह वाढेल. नोकरीमध्ये जादा कामाचे नियोजन सध्या तरी करावे लागणार नाही. वेतनवाढीचा प्रश्न निकालात निघेल. त्यामुळे मरगळ कमी होईल. गरजे पुरते धन उपलब्ध होईल. मात्र त्याचा विपर्यास करू नका. राजकीय क्षेत्रातील दबावतंत्र कमी होईल. धार्मिक गोष्टींची आवड राहील. शारीरिक समतोल व आहार योग्य राखाल. >> शुभ दिनांक : १०, १५ >> महिलांसाठी : ठरवलेले नियोजन योग्य पद्धतीने पार पाडाल. सप्ताहाची सुरुवात खर्चदायक करू नका. अमावास्येचा कालावधी संमिश्र फळ देणारा ठरेल. व्यावसायिकदृष्टय़ा स्पर्धा करणे टाळा. उद्योगधंद्यात मोबदला मिळवण्याचा प्रयत्न करा. हलकी सुरुवातसुद्धा मनाला धीर देणारी असेल. मागील अनुभव लक्षात घ्या. त्यानुसार हालचाली करा. एकदम काम उरकू नका. नोकरदार व्यक्तीने कामाच्या नोंदी ज्या-त्या वेळी करा. त्यात हलगर्जीपणा करणे टाळा. महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्या. कोणताही गोंधळ तुमच्या हातून होऊ देऊ नका. मागील नोंदी तपासून पाहा. त्यानंतरच पुढील गोष्टींना हात घाला. आर्थिकदृष्टय़ा खर्चाचे नियोजन करा. सार्वजनिक क्षेत्रात वेळेला महत्त्व द्या. कौटुंबिक जीवन अनुकूल राहील. मानसिक संतुलन राखा. प्रकृतिस्वास्थ्य जपा. >> शुभ दिनांक : १४, १५ >> महिलांसाठी : होणारी धावपळ कमी करा व विश्रांती घ्या. व्ययस्थानातून अमावास्या होत आहे. इतरांच्या वैयक्तिक गोष्टींची चर्चा करणे टाळा. धार्मिक गोष्टीत मन रमवण्याचा प्रयत्न करा. १४ जानेवारी रोजी होणारे रवीचे राशिपरिवर्तन हे प्रथम स्थानात मकर राशीमध्ये होत आहे. उद्योग-धंद्यात होणारा तोटा कमी होईल. कारखानदारीचा प्रश्न मार्गी लागेल. नियम व अटींचे पालन करावे लागेल. तुटलेला संपर्क पुन्हा साधता येईल. नोकरदार व्यक्तींनी परिश्रमाला महत्त्व द्यावे. बेजबाबदारपणे कोणतेही कार्य करू नका. आर्थिकदृष्टय़ा प्रगती होईल. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांची कृपा राहील. कौटुंबिक वातावरणातील गोडी वाढेल. तरुणवर्गाला विवाहाचे प्रस्ताव येतील. मनाची लवचीकता वाढेल. आरोग्य उत्तम असेल. >> शुभ दिनांक : १५, १६ >> महिलांसाठी : मकरसंक्रांतीनिमित्त नात्यातील गोडवा वाढवण्याचा प्रयत्न कराल. संधीची वाट न पाहता प्रयत्नांवर भर द्या. अमावास्या काळात अंदाजे कृती करणे टाळा. १४ जानेवारी रोजी रवी मकर या राशीत तुमच्या व्ययस्थानात येत आहे. बुद्धिचातुर्याने इतरांवर छाप पाडाल. अडचणीच्या काळात अपेक्षित मदत मिळेल. वडिलोपार्जति व्यवसायाला हातभार लावा. व्यावसायिकदृष्टय़ा यश मिळवणे हे तुमच्याच हाती आहे. कामाचा भार हलका होईल. वेळेचे महत्त्व वाढेल. नोकरदार व्यक्तींचे मानसिक दडपण कमी होईल. प्रश्नांतून सुटका होईल. सुरळीत गोष्टी घडतील. नवीन कला अवगत करा. त्याचा आर्थिकदृष्टय़ा फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात तुमचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. मित्रपरिवारासाठी मदत कराल. नातेवाईकांशी संवाद साधाल. शारीरिक दगदग कमी करा. >> शुभ दिनांक : १०, १६ >> महिलांसाठी : बोलण्यातील गोडी टिकवून ठेवा. चंद्राचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. अमावास्या कालावधीत कामावर लक्ष केंद्रित करा. १४ जानेवारी रोजी रवी मकर राशीत प्रवेश करत आहे. व्यापार-उद्योग क्षेत्रात मोजक्या कामांचे स्वरूप बदलेल. व्यावसायिक स्तरावर नवीन संधी प्राप्त होईल. या संधीचा फायदा करून घ्या. देवाणघेवाण करणे सहज शक्य होईल. त्यासाठी मात्र अति घाई करणे टाळा. सुयोग्य पद्धतीचा वापर करा. नोकरीतील अटीतटी कमी होतील. बारकाव्याने कामाकडे लक्ष द्या. आर्थिक गुंतवणूक उत्तम राहील. राजकीय क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. मुलांसाठी नवीन काही योजना अमलात आणाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मानसिकदृष्टय़ा द्विधा अवस्था कमी होईल. आरोग्य ठणठणीत असेल. >> शुभ दिनांक : १०, १४ >> महिलांसाठी : मकरसंक्रांतीनिमित्त जिवलग मत्रिणीची भेट होईल.

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल