-
राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर पडदा पडल्यानंतर अखेर राम मंदिर उभारणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरांच्या कामाची पायाभरणी करण्यात आली होती. त्यानंतर जागेचं सपाटीकरण करण्यात आलं. सध्या खोदकाम करण्यात येत आहे. (फोटो सौजन्य : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र। ट्विटर)
-
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मंदिराच्या पायाभरणीसाठी खोदकाम करून १ लाख २० हजार माती बाजूला काढण्यात आली. आता सिंमेटचे चार स्तर अंथरण्याचं काम सुरू झालं आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत हे काम चालणार असल्याचं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने म्हटलं आहे. (फोटो सौजन्य : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र। ट्विटर)
-
अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणात गाजलेल्या अयोध्येतील बाबरी मशिद रामजन्मभूमी वादावर ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला. वादग्रस्त जागेवर राम मंदिराचं निर्माण करण्यात यावं, तर मशिदीसाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा देण्यात यावी, असं न्यायालयानं आपल्या निकाल पत्रात म्हटलं होतं.
-
सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापिठानं हा निकाल दिला होता. (फोटो सौजन्य : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र। ट्विटर)
-
हा निकाल देतानाच सर्वोच्च न्यायालयानं राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेशही केंद्र सरकारला दिले होते. न्यायालयाच्या निर्णयप्रमाणे केंद्र सरकारनं रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास स्थापना केली. तसेच अध्यक्ष आणि विश्वस्तांची नेमणूक केली. त्यानंतर राम मंदिराचं काम सुरू होण्याच्या दृष्टीनं पावलं पडली होती. (फोटो सौजन्य : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र। ट्विटर)
-
मंदिर उभारणीच्या जागेचं काम काही दिवसांपूर्वी थांबवण्यात आलं होतं. भारत-चीन सीमावादाचा प्रश्न निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करून मंदिराच्या कामाला प्रारंभ झाला.
-
मंदिरासाठी खोदकाम करताना अनेक मूर्ती आणि ऐतिहासिक खांब आढळून आले आहेत. दहा दिवसांपासून काम सुरू असून, खांब आणि इतर वस्तू सापडल्या होत्या.
-
यात देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश आणि नक्षीदार खांब सापडले आहेत. त्याचबरोबर शिवलिंगही सापडले असून, कुबेर तिलासारखी वस्तू आदींचा समावेश होता.
-
गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची पूर्वी १२८ फूट इतकी होती, ती वाढवण्यात आली आहे. आता कळसाची उंची १६१ फूट इतकी असणार आहे. यात मंदिराच्या भिंती ६ फुटांच्या दगडांनी बांधण्यात येणार आहे. तर दरवाजा संगमरवरी दगडानं बनवण्यात येणार आहे.
-
मंदिराच्या पूर्वीच्या रचनेत तीन कळस होते. मात्र सुधारित प्रस्तावात आता ५ कळस असणार आहेत. तर मंदिराला पाच प्रवेशद्वार असणार आहेत.
-
मंदिराच्या उभारणीसाठी लागणाऱ्या दगडांचा शोध घेण्याचं कामही सुरू करण्यात आलं आहे. आतापर्यंत ८० हजार घनफूट दगड घडवण्यात आले आहेत.
-
राम मंदिराच्या बांधकामासाठी अंदाजित खर्च ३०० कोटी रुपये इतका असणार आहे. तर परिसरातील २० एकर जागेचं सुशोभीकरण करण्यासाठी तब्बल एक हजार कोटी इतका खर्च असणार आहे.
-
मंदिराच्या उभारणीसाठी लागणाऱ्या दगडांपासून खांब घडवण्यात आले आहेत.
-
मंदिर उभारण्यासाठी निधी संकलित केला जात असून, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते चार लाख गावांच्या ११ कोटी कुटुंबीयांशी संपर्क साधणार आहेत.
-
मंदिराच्या कामासाठी लागणारे दगडी खांब मंदिर परिसरात घेऊन जाण्याचं कामही सुरू झालं आहे. (फोटो सौजन्य : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र। ट्विटर)

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”