-
२००५ ला फ्रान्स देशाशी करार झाला. फ्रान्सकडे असलेल्या स्कॉर्पिन पाणबुडीचे तंत्रज्ञान भारताकडे हस्तांतर करत त्यावर आधारीत ६ पाणबुड्यांची निर्मिती करण्याचे निश्चित झाले.
-
या पाणबुड्यांचे ‘कलवरी’ वर्गातील पाणबुड्या असे नामकरण करण्यात आले. २०१२ ला पहिली पाणबुडी दाखल होणे अपेक्षित होते, मात्र या प्रकल्पाला विलंब झाला. अखेर १४ डिसेंबर २०१७ या वर्गातील पहिली पाणबुडी ‘आयनएस कलवरी’ नौदलाच्या सेवेत दाखल झाली.
-
कलवरी नंतर ‘आयएनएस खंडेरी’, ‘आयएनएस करंज’ या पाणबुड्या नौदलात दाखल झाल्या. आता ‘आयएनएस वेला’ ही पाणबुडी मुंबईत नौदल प्रमुखांच्या उपस्थितीत नौदलात दाखल होत आहे.
-
आयएनएस वेलाच्या बांधणीला २०१६ च्या सुमारास सुरुवात झाली. मे २०१९ मध्ये वेलाचे जलावतरण झाले आणि चाचण्यांना सुरुवात झाली. दोन वर्षांच्या कसून चाचण्यांनंतर वेला आता नौदलात दाखल होत आहे.
-
सुमारे १७०० टन वजनाच्या कलवरी वर्गातील पाणबुड्या या सलग ५० दिवस समुद्रात कार्यरत राहू शकतात आणि एक दमात १२ हजार किलोमीटर अंतर पार करु शकतात. अत्याधुनिक Exocet क्षेपणास्त्र आणि पाणतीरांनी ( torpedo) ही पाणबुडी सज्ज आहे.
-
कलवरी वर्गातील पाणबुड्या या डिझेल-इलेक्ट्रिक प्रणालीवर चालतात आणि जगात सर्वोत्कृष्ठ म्हणून ओळखल्या जातात. या वर्गातील आणखी दोन पाणबुड्या लवकरच नौदलात दाखल होण्याच्या मार्गावर आहेत.
कतरिना कैफ ४२ व्या वर्षी झाली आई, विकी कौशलने दिली गुड न्यूज, माधुरी दीक्षित कमेंट करत म्हणाली…