-
नौदलाचे २५ वे नौदल प्रमुख म्हणून अॅडमिरल आर हरी कुमार यांनी मावळते नौदल प्रमुख करमबिर सिंह यांच्याकडून आज सुत्रे स्विकारली
-
नवी दिल्ली इथे नौदल मुख्यालयात झालेल्या शानदार कार्यक्रमात नव्या नौदल प्रमुखांना मानवंदना देण्यात आली
-
नौदल प्रमुख म्हणून पदभार स्विकारण्याआधी व्हाईस अॅडमिरल पदावर आर हरी कुमार हे पश्चिम नौदलाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते
-
राष्ट्रीय संरक्षण अकादमी – NDA चे स्नातक असलेले आर हरी कुमार हे एक जानेवारी १९८३ ला नौदलात दाखल झाले
-
तब्बल ३८ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी नौदलाच्या विविध युद्धनौकांवर, विभागात, कमांडमध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. कारकिर्दीची सुरुवात त्यांनी युद्धनौकेवरील तोफखाना विभागातून केली
-
आयएनएस विपुल, रणजीत, कुथर अशा विविध युद्धनौकांवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. तर युद्धनौका आयएनएस कोरा, रणवीर आणि विमानवाहु युद्धनौका विराट या युद्धनौकांचे त्यांनी नेतृत्व केलं
-
नौदल प्रमुख म्हणून सुत्रे स्वीकारल्याचा सोपस्कार पार पाडल्यावर अॅडमिरल आर हरी कुमार यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या त्यांच्या आईचे आशिर्वाद घेतले

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक