-
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज किल्ले रायगडाला भेट देणार आहे.
-
या पार्श्वभुमीवर पाचाड आणि रायगड परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
-
रायगडाकडे जाणारे सर्व रस्ते पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पोलीस बंदोबस्तासह, एसपीजी कमांडोजही तैनात करण्यात आले आहेत.
-
यापुर्वी माजी राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांनी १९८५ साली किल्ले रायगडाला भेट दिली होती.
-
त्यानंतर राष्ट्रपती कोविंद रायगडावर येणारे दुसरे राष्ट्रपती असणार आहेत.
-
त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर रायगड परीसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
अडीच हजार पोलीस अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा दलाचे कमांडो, राज्य राखीव दल, शिघ्र कृती दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
-
दुपारी १२ वाजता राष्ट्रपती हेलिकॉप्टरने पाचाड येथे दाखल होणार आहे. तेथून रोपवेने ते रायगड किल्ल्यावर जाणार आहेत.
-
राष्ट्रपती कोविंद राजसदरेवर महाराजांच्या सिंहासनावरुढ पुतळ्याला अभिवादन करणार आहेत.
-
यानंतर होळीचा माळ आणि शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाला राष्ट्रपती भेट देणार आहेत.
-
राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी रायगडावर जय्यत तयारी करण्यात आली आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणाऱ्या मेघडंबरीला फुलांची विशेष सजावट करण्यात आलीय. तसेच रायगडावर रेड कार्पेट अंथरण्यात आल्याचं दिसत आहे.
सोनाली कुलकर्णीचा लेकीसह जबरदस्त डान्स! २२ वर्षांपूर्वीच्या Disco गाण्यावर धरला ठेका, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स, पाहा…