-
आजपासून (१५ डिसेंबर) इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत.
-
करोनाच्या नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
-
मागील वर्षीच्या मार्चपासून हे वर्ग करोना परिस्थितीमुळे बंदच होते.
-
ठाणे येथील आनंद विश्व गुरुकुल मधील विद्यार्थ्यांचे ढोल ताश्याच्या गजरात स्वागत करण्यात आले.
-
तसेच रांगोळी काढून फुलांची सजावट ही करण्यात आली होती.
-
नाताळ सण जवळ येत असल्याने दोन सांताक्लॉजही विद्यार्थ्यांच्या स्वागताला उपस्थित होते.
-
शाळेत प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे सॅनिटायझेशन करण्यात आले तसेच सोशल डिस्टन्स ठेऊन वर्गात बसविण्यात आले आहे अशी माहिती शाळेच्या विश्वस्त डॉ. हर्षदा लिखाते व मुख्याध्यापिका डॉ. वैदेही कोळंबकर यांनी दिली.
-
(सर्व फोटो : दीपक जोशी, इंडियन एक्सप्रेस)

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात