-
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर राज्यभरात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात येत आहे.
-
पुणे जिल्ह्यात सध्या बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडाला आहे. पुण्याच्या आंबेगाव, मावळ या भागात बैलगाडा शर्यती धुमधडाक्यात पार पडल्या आहेत. पण, चर्चा मात्र मधू नानांची आहे.
-
पुण्यातील मावळ तालुक्यात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घोडीवर स्वार होऊन बैलगाडा शर्यतीच्या पुढे धावणाऱ्या ७५ वर्षीय नानांची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा आहे.
-
बैलगाड्यांच्या पुढे घोडी पळवणाऱ्या नानांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांच्या धाडसाचं कौतुक होत आहे.
-
मधू नाना पाचपुते हे बैलगाडापुढे घोडी पळवतात. गेल्या ५० वर्षापासून बैलजोडीपुढे घोडी पळवण्याचा छंद नाना यांना आहे.
-
बैलगाडा शर्यती सुरू झाल्यापासून नाना आनंदी आहेत. गेल्या काही वर्षांपासून बैलगाडावर शर्यतीवर बंदी होती. त्यावेळी नानांनी त्यांच्या घोडीचा अगदी मुलीप्रमाणे सांभाळ केला असे सांगितले. -
मधू नाना हे ७५ वर्षाचे असून त्यांची आवड जोपासण्यासाठी ते घोडीवर स्वार होऊन बैलगाडांच्या पुढे सुसाट धावतात.
-
नाना घोडीवर थाप देऊन दोन्ही हात उंचावत टाळ्या मारतात तेव्हा, घाटातील दृश्य बघण्यासारखे असते. प्रत्येक बैलगाडा प्रेमी, शौकीन हा केवळ अन केवळ श्वास रोखून मधून नानांचा उत्साह पाहात असतो.
-
बैलगाड्यांच्या पुढे घोडी घेऊन पळणाऱ्या नानांना पाहून तरुणांना लाजवेल असा उत्साह दिसून येतो.
-
नानांच्या घरी दोन बैलजोड्या आहेत आणि त्या शर्यतीमध्ये भाग घेतात.
-
नानांकडे दोन बैलजोड्यांच्या सोबतीला पारो नावाची घोडी आहे
-
गेल्या तीन ते चार पिढ्यांपासून त्यांचे कुटुंब बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेते
-
पण, नानांनी बैलगाडापुढे घोडी पळण्याच्या नाद जोपासला आहे.
-
घाटात गेलो की माझ्या आणि घोडीच्या अंगात उत्साह संचारतो. घोडीवर स्वार होऊन बैलगाडा पुढे पारो (घोडी) सुसाट धावते असे नानांनी सांगितलं आहे
-
त्यामुळे वयाच्या ७५ व्या वर्षी देखील मधू नाना पाचपुते हे तरुणांसाठी ते प्रेरणादायी ठरत आहेत. (सर्व फोटो – कृष्णा पांचाळ)
तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिचा विपरीत राजयोग; ‘या’ ३ राशीच्या लोकांचं नशिब पालटणार, कर्जमुक्ती सोबत पैसाही भरपूर येणार…