-
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहेत. नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं होतं.
-
अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए) अंतर्गत ईडीने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे.
-
”अटक केली आहे, पण घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू,” दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आठ तासांच्या चौकशीनंतर ईडी कार्यालयाबाहेर आल्यावर अशी प्रतिक्रिया दिली.
-
मला ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणलं तिथं समन्सवर सही करण्यास सांगितलं, असं नवाब मलिक यांनी न्यायालयात सांगितलं आहे.
-
जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती.
-
”देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू” असा इशारा नवाब मलिक यांनी या अगोदर दिला होता.
-
मलिक यांना चौकशीसाठी घेऊन गेल्यापासूनच ईडी कार्यालयाबाहेर गर्दी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
-
आज सकाळी नवाब मलिक यांनी चौकशीसाठी ईडी कार्यलयात आणलं गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर तसंच मलिकांच्या निवासस्थानाबाहेरही जमले आहे. या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ईडी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
-
या अटकेमुळे दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, ईडी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिकांच्या कार्यालयाकडून एक ट्वीट करण्यात आलं आहे. “जुल्मी जब जब जुल्म करेगा सत्ता के गलीयों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इंक्लाब के नारो से…” असं या ट्वीटमध्ये म्हटलं गेलं आहे.
तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिचा विपरीत राजयोग; ‘या’ ३ राशीच्या लोकांचं नशिब पालटणार, कर्जमुक्ती सोबत पैसाही भरपूर येणार…