-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) आज इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला.(सर्व फोटो – सागर कासार)
-
विद्यार्थ्यांसोबत पालकवर्ग आणि शिक्षकांना देखील या निकालाची आतुरता होती.
-
मंडळाकडून विभागनिहाय निकालाची टक्केवारीसह तपशील जाहीर करण्यात आला.
-
विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता आला.
-
निकाल जाहीर होताच पुण्यातील विविध शाळांमधील दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी ढोल-ताशा वाजवून जल्लोष केला.
-
तसेच, विद्यार्थींनीनी एकमेकींना पेढे भरवून आनंद साजरा केला.
-
विद्यार्थ्यांच्या आनंदात पालकांसोबतच शिक्षकही सहभागी झाले होते.
-
१० वीची पुरवणी परीक्षा २७ जुलैला सुरू होईल. ही परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या दरम्यान असेल.
-
२०२१ मध्ये अंतर्गत मुल्यमापनाद्वारे निकाल घोषित करण्यात आला होता. त्यामुळे २०२० ची तुलना २०२२ शी केली असता २०२० च्या तुलनेत २०२२ चा निकाल १.६४ टक्क्यांनी जास्त आहे. २०२१ मध्ये हा निकाल ९९.९५ टक्के होता.
-
नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.९६ टक्के इतकी आहे.
-
तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०६ टक्के आहे.
-
मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा १.९० टक्के इतकी जास्त आहे. अशाप्रकारे यावर्षी देखील मुलींनीच बाजी मारली.
-
हा आनंद मुलींनी आपल्या मैत्रिणींसोबत साजरा केला
-
तर, मुलांनी ढोल वाजवून शाळा परिसर दणाणून सोडला होता.
-
पालक, शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे पेढा भरवून कौतुक केले

Operation Sindoor: भारतीय हवाई दलाचा पाकिस्तानला जबरदस्त दणका; ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाडली पाकिस्तानी लष्कराची ६ विमाने