-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-इस्रायल युद्धसमाप्तीची घोषणा केल्यानंतर इराण-इस्रायलमधील संघर्ष काही प्रमाणात निवाळल्याचं दिसून येत आहे. (Photo – Reuters)
-
इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेनेही उडी घेत इराणमधील ३ आण्विक तळांवर हल्ला करत ते आण्विक तळ नष्ट केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. (Photo: AP)
-
इराण-इस्रायलमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असली तरी दोन्ही देशांतील नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.(Photo: Reuters)
-
दरम्यान, इस्रायल-इराणमधील युद्धविरामानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर बदल्ल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. (प्रातिनिधीक छायाचित्र)
-
एवढंच नाही तर इस्रायल-इराणमधील युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प हे इराणवर लादलेल्या निर्बंधांमध्येही सवलत देण्यास सहमत असल्याचंही वृत्त माध्यमांत होतं. (Photo : प्रातिनिधीक छायाचित्र)
-
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराणबरोबर नवा करार करण्याची योजना आखल्याचं वृत्त माध्यमांत होतं. त्यामध्ये इराणला ३० अब्ज डॉलर्सची मदत देण्याची तयारी दर्शवल्याचं म्हटलं होतं. (Photo : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका बदलली आहे का? अमेरिका इराणला खरोखर ३० अब्ज डॉलर्सची मदत देणार आहे का? याबाबत अनेक सवाल उपस्थित करण्यात आले.(फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
अमेरिकेने इराणच्या ३ आण्विक तळांवर हल्ला करत ते नष्ट केल्याचा दावा केला. मात्र, त्यानंतर इराणवर लादलेल्या निर्बंधांमध्ये अमेरिका सवलत देण्याच्या चर्चांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
दरम्यान, या सर्व चर्चांवर आता खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा खुलासा केला. अमेरिका इराणला ३० अब्ज डॉलर्स देण्याचं वृत्त सपशेल खोटं असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं.(फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
