-
Maharashtra Navnirman Sena Protest Rally: मराठी भाषिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
-
या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) व मराठी एकीकरण समिती व अन्य संघटना यांच्या मार्फत मंगळवारी (०८ जुलै) सकाळी दहा वाजल्या पासून मिरा भाईंदर (Mira Bhayandar) शहरात मोर्चा काढण्यात आला आहे.
-
घटनास्थळी उपस्थित असलेल्या हिंदी भाषिक दुकानदारांनी आपली दुकाने बंद केल्याचे दिसून आले.
-
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले ‘काही कार्यकर्त्यांना आज तडीपारीच्या नोटिसा दिल्या.’
-
‘मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे (CM Devendra Fadnavis) मीरा भाईंदरचे डीसीपी प्रकाश गायकवाड यांच्याविरोधात तक्रार केली.’
-
‘कालपासून पोलिसांनी केलेली कारवाई योग्य नाही. मराठी भाषिकांनी शांततापूर्ण मार्गाने मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागितली असेल, तर ती त्यांना द्यायला हवी.’
-
‘पोलिसांची दादागिरी चालणार नाही. मी त्याचा निषेध व्यक्त करतो.’
-
‘आता मी स्वत: त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालो आहे. पोलिसांची हिंमत असेल, तर त्यांनी मला अटक करून दाखवावी’ असे ते म्हणाले.
-
प्रताप सरनाईक आले तेव्हा मराठी भाषिक आंदोल करण्याऱ्यांनी ‘सरनाईक गो बॅक’ आणि ‘जय गुजरात’च्या घोषणा दिल्या.
-
या सर्व घोषणांनंतर प्रताप सरनाईक यांनी मोर्चातून काढता पाय घेतला आहे. (फोटो – आकाश पाटील, इंडियन एक्सप्रेस)

“टॉवेल, बनियानवरील माजलेल्या आमदारानं…”, संजय गायकवाड मारहाणीचे विधानपरिषदेत पडसाद