-
ओडिशातील एका कनिष्ठ श्रेणीच्या वन अधिकाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींची रोकड सापडल्याची घटना समोर आली आहे. दक्षता विभागाने शुक्रवारी (२५ जुलै) ही कारवाई केली. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
ओडिशा दक्षता विभागाने वन अधिकाऱ्याच्या घरावर छापे टाकले असता दोन घरांमधून १.४३ कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे. (फोटो-एएनआय एक्स व्हिडीओ)
-
ओडिशा दक्षता विभागाने केलेल्या या कारवाईत १.४३ कोटींपेक्षा जास्त रुपयांची रोख रक्कम आणि लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि महागडे कपडेही आढळून आले आहेत.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
कारवाईत काय आढळलं? : या अधिकाऱ्याकडे घराच्या एका गुप्त तिजोरीत लपवून ठेवलेली १.४३ कोटी रुपयांची रोकड, १.३२ कोटींचे बँक डिपॉझिट, १.५ किलो सोने आणि ४.६३७ किलो चांदी आढळून आली आहे. (फोटो-एएनआय)
-
कोरापूत जिल्ह्यातील जयपुर फॉरेस्ट रेंज येथील डेप्युटी रेंजर रामचंद्र नेपाक यांच्याशी संबंधीत सहा मालमत्तांवर एकाच वेळी शुक्रवारी दक्षता विभागाने धाडी टाकल्याची माहिती दक्षता विभागाने दिली आहे. (फोटो-एएनआय)
-
अधिकाऱ्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे पाच महिन्यानंतर हे अधिकारी सेवेतून निवृत्त होणार होते, त्याआधी ही कारवाई झाली. (फोटो-एएनआय)
-
ओडिशा दक्षता विभागाच्या कारवाईत या अधिकाऱ्याकडे स्थावर मालमत्तेमध्ये ३,६०० चौरस फूट क्षेत्रफळाची तीन मजली इमारत, भुवनेश्वरमध्ये १,८०० चौरस फूट क्षेत्रफळाचा ३ बीएचके फ्लॅट आणि जयपुर शहरात १,५०० चौरस फूटाचे दोन फ्लॅट आणि दोन महागडे प्लॉट सापडले आहेत. (फोटो-एएनआय)
-
ओडिशा दक्षता विभागाच्या या कारवाईत एका वन अधिकाऱ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती आणि कोट्यवधींची रोकड सापडल्यामुळे ओडिशामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.(फोटो-एएनआय)
-
ओडिशा दक्षता विभागाने केलेल्या या कारवाईत कोट्यवधींची रक्कम जप्त करण्यात आल्यानंतर आता पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. (फोटो-एएनआय)

“जेवढं मिळतंय त्यात आनंद मानायला शिका”; आयुष्यात सतत तक्रार करणाऱ्यांनो चिमुकलीचा ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी