-
रशियातल्या भूकंपाने झालेला विध्वंस आता फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमांतून समोर येत आहे. भूकंपातील हादऱ्यामध्ये अनेकांचे प्राण जाता-जाता वाचले आहेत. (Photo: Social Media/X)
-
रशियातल्या कामचटका द्वीपकल्पाजवळ झालेल्या भयानक भूकंपानंतर काही वेळातच, रशियाच्या कुरिल बेटांच्या किनारी भागात आणि जपानच्या मोठ्या उत्तरेकडील बेट होक्काइडोला त्सुनामी आली आहे. (Photo: AP)
-
रशियाथ ८.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला आहे. रशियानंतर जपानच्या अनेक भागात त्सुनामीच्या लाटा उसळू लागल्या आहेत. (Photo: Reuters)
-
याशिवाय हवाई, अलास्का आणि कॅनडाच्या पश्चिम किनाऱ्यावरही त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. (Photo: AP)
-
रशियातील भूकंपाच्या भयानक दृश्यांमध्ये बड्या इमारती उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. (Photo: Social Media/X)
-
जपानच्या हवामान संस्थेने सांगितले की, सुमारे ३० सेमी (सुमारे एक फूट) उंच असलेली पहिली त्सुनामीची लाट होक्काइडोच्या पूर्व किनाऱ्यावरील नेमुरो येथे पोहोचली. (Photo: AP)
-
भूकंपामुळे आलेल्या त्सुनामीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये समुद्रात उंच लाटा उसळताना दिसत आहेत. (Photo: Reuters)
-
त्याच वेळी, पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने म्हटले आहे की भरती-ओहोटीमुळे हवाई, चिली, जपान आणि सोलोमन बेटांच्या काही किनारी भागात १ ते ३ मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. (Photo: Reuters)
-
रशियामध्ये भूकंपानंतर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. वाहने जिथे होती तिथेच उभी असल्याचे दिसून आले. (Photo: Reuters)
-
तसेच, रशिया आणि इक्वेडोरच्या काही किनारी भागात ३ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळू शकतात. (Photo: Social Media/X)
-
रशियामध्ये भूकंपाचा फटका एका शाळेलाही बसला आहे. या शाळेचा काही भाग कोसळल्याचे पाहायला मिळते आहे. (Photo: Social Media/X)
-
रशियाच्या सुदूर पूर्वेकडील शक्तिशाली भूकंपानंतर जपानच्या काही भागांमध्ये त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आल्यानंतर, उत्तर जपानमधील होक्काइडोमधील मुकावा शहरातील अग्निशमन केंद्राच्या छतावर लोक आश्रय घेत आहेत. (Photo: AP) हेही पाहा- Earthquake In Russia: काय आहे रिंग ऑफ फायर? रशियामधील सर्वात मोठ्या भूकंपानंतर पुन्हा चर्चेत…

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत