-
Independence Day 2025 : ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्यापासून ते दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीपर्यंत अनेक खेळाडू व बॉलिवूड सेलेब्रिटींनी भारतीयांना देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
इंस्टाग्रामवर शुभेच्छा शेअर करताना बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने लिहिले आहे की, “जेव्हा आपण आपल्या पायाखालची जमीन जपतो तेव्हा स्वातंत्र्य अधिक उजळ वाटते. जेव्हा मी समुद्रकिनाऱ्यावरील व्हॉलीबॉलचा आनंद घेत होतो तेव्हा माझे समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणारे हे खऱ्या जीवनातील नायक (सफाई कर्मचारी) भेटले, तेव्हा खूप आनंद झाला.” (फोटो : अक्षय कुमार इन्स्टाग्राम)
-
सोशल मीडिया स्टोरीमध्ये करीना कपूर खानने म्हटलं आहे की ‘स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा’ (फोटो : करीना कपूर इन्स्टाग्राम)
-
कमल हासन यांनी एक खास पोस्ट पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “स्वातंत्र्य म्हणजे स्वप्न पाहणे, नवोन्मेष घडवणे, उन्नती करणे, मिठाच्या सत्याग्रहापासून ते अंतराळ युगापर्यंत, भारताला अधिक मजबूत बनवणाऱ्यांचा आपण आदर करूया, स्वातंत्र्याचा विस्तार करत राहूया, ज्या धैर्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले ते आता आपण प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक मनात नेऊया. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. जय हिंद.” (फोटो : पीटीआय)
-
आधुनिक काळातील भारतीय क्रिकेटचा अभिमान असलेल्या विराट कोहलीने देशासाठी शहीद झालेल्या वीरांच्या बलिदानाला अभिवादन करणारी एक स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. (फोटो : विराट कोहली इन्स्टाग्राम)
-
प्रियांका चोप्रा-जोनासने देखील स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो : प्रियांका चोप्रा-जोनास इन्स्टाग्राम)
-
हेमा मालिनी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या गौरवशाली दिनाशी संबंधित अनेक फोटो शेअर केले आहेत. तसेच त्या ‘हर घर तिरंगा’ मोहीमेत सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. फोटो : हेमा मालिनी/इन्स्टाग्राम)
-
अभिषेक बच्चनने इन्स्टाग्रामवरून चाहत्यांना ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणारी एक छोटीशी क्लिप शेअर केली आहे. (फोटो : अभिषेक बच्चन इन्स्टाग्राम)
-
“जगभरात राहणाऱ्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! आपला देश प्रगती करत राहो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो”, असं म्हणत अभिनेते अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. (फोटो : अनुपम खेर इन्स्टाग्राम)
-
चंदीगडच्या माजी खासदार किरण खेर यांनीही भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो : किरण खेर इन्स्टाग्राम)
-
अभिनेता राजकुमार रावने देखील सर्वंना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याने म्हटलं आहे की “आपल्या राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी कष्ट करणाऱ्या, बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांचे आभार. जय हिंद”(फोटो : राजकुमार राव इन्स्टाग्राम)

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पहिल्यांदाच EVMची फेरमतमोजणी; तीन वर्षांनंतर फिरला निवडणुकीचा निकाल