-
मुंबईमध्ये शनिवार, रविवार व आज सोमवारीही पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते आहे.
-
त्यामुळे मुंबईकरांना कामावर पोहोचताना पावसाच्या तडाख्याचा सामना करावा लागतो आहे.
-
या पावसाचा काहीसा फटका गणेश भक्तांनाही बसल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत गणपती आगमन सुरु असताना टिपलेला क्षण.
-
त्यामुळे मुंबईकर सध्या कामावरुन ये-जा करताना छत्र्यांचा व रेनकोट्सचा आधार घेताना पाहायला मिळताहेत.
-
हे सर्व फोटो लोकसत्ताच्या छायाचित्ररकारांनी मुंबई व उपनगरात टिपली आहेत.
-
रविवारी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने आयएमडीने शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता.
-
तर दुसरीकडे १७ ते १९ऑगस्ट दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि १९ व २० ऑगस्टला गुजरातमधील सौराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
-
आजपासून २१ ऑगस्टपर्यंत मध्य महाराष्ट्र, गुजरात, २० ऑगस्टपर्यंत कोकण, गोवा, १८ ऑगस्टला मराठवाड्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
-
(सर्व फोटो साभार- एक्सप्रेस फोटो- आकाश पाटील) हेही पाहा- Photos : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर बचावकार्य सुरू; किमान ६० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”