-
निवडणूकीला उभे रहाताना प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपली संपत्ती शपथपत्राद्वारे जाहीर करावी लागते. मात्र, देशातील कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री सर्वात श्रीमंत आहे? हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात. (फोटो-संग्रहित छायाचित्र
-
देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण? आणि सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? तसेच कोणाकडे किती संपत्ती? या संदर्भातील माहिती एका अहवालामधून समोर आली आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सचा (एडीआर) एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालामध्ये देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण? आणि सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? याविषयीची माहिती देण्यात आल्याचं वृत्त मनी कंट्रोलने दिलं आहे.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
अहवालानुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देशातील सर्व राज्याच्या प्रमुखांमध्ये सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत. ममता बॅनर्जी यांची घोषित मालमत्ता १५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रांवरून ही माहिती देण्यात आली आहे.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू हे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. चंद्राबाबू नायडू यांची संपत्ती ९३१ कोटींपेक्षा जास्त असल्याचं अहवालात म्हटलं आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मुख्यमंत्री पेमा खांडू यांची संपत्ती ३३२ कोटी रुपये असल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा गरीब मुख्यमंत्र्यांच्या यादीत तिसरा क्रमांक लागतो. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची मालमत्ता ५५ लाख रुपयांची आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा गरीब मुख्यमंत्र्यांच्या यादीत चौथा क्रमांक लागतो. पिनारायी विजयन यांची १ कोटी रुपये एवढी संपत्ती असल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे.(फोटो-संग्रहित छायाचित्र)

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा