-
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी आज टेस्ला मॉडेल वाय ही कार खरेदी केली आहे.
-
त्यांच्या सोशल मीडियावर कार खरेदी केलेले शोरुममधील फोटो शेअर केले आहेत.
-
दरम्यान, प्रताप सरनाईक हे टेस्ला मॉडेल वाय खरेदी करणारे देशातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.
-
अलीकडेच टेस्लाने मुंबई, दिल्ली या मोठ्या शहरांमघ्ये त्यांचे अत्याधुनिक शोरूम सुरू केले आहेत.
-
टेस्लाच्या मॉडेल वायची वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूयात….
टेस्ला मॉडेल वाय (Tesla Model Y) ६० kWh आणि ७५ kWh या दोन बॅटरी पॅक पर्यायांसह उपलब्ध आहे. -
६० kWh बॅटरी एका चार्जवर ५०० किमी (WLTP प्रमाणित) अंतर चालते तर लांब पल्ल्याच्या अंतरासाठी ६२२ किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज मिळते.
-
ही कार ७ वेगवेगळ्या बॉडी कलर्स आणि २ इंटीरियर थीममध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे किंमत देखील बदलते.
-
टेस्ला मॉडेल वाय कारची ५९.८९ लाख ते ६७.८९ लाख इतकी किमंत आहे.
-
ही कार ५.६ सेकंदांमध्ये शून्य ते १०० इतका वेग गाठते. तिच्यामध्ये स्वतंत्र टचस्क्रीन आणि इलेक्ट्रिक अॅडजेस्टबल फंक्शनही देण्यात आले आहे.
-
दरम्यान, कार खरेदी केल्यानंतर बोलताना “इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतू, समृद्धी महामार्गांसह प्रत्येक ठिकाणी सूट देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनं बनवणाऱ्या कंपन्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे.” असं मत परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केलं आहे, तसेच ही कार ते त्यांच्या नातवाला गिफ्ट देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
-
(सर्व फोटो साभार- प्रताप सरनाईक इन्स्टाग्राम) हेही पाहा- Teachers Day 2025: विकास दिव्यकीर्ती ते खान सर; देशातले ‘हे’ ७ शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये एवढे लोकप्रिय का आहेत?

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी