-
करोनानं जग निराशेच्या गर्तेकडे झुकत चाललं आहे. सर्व काही विस्कळीत झालं आहे. लोक घरांमध्ये बंदिस्त झाले आहेत. सगळ्यांच्या एकाच गोष्टीकडं लागल्या आहेत. त्या म्हणजे करोनाचं संकट कधी थांबणार? अशा बिकट अवस्थेतही जगभरातील कलाकारांच्या कलेला नवे धुमारे फुटले आहेत. कलेच्या माध्यमातून हे कलाकार करोनाच्या संकटातून पुन्हा उभारी घेण्याला बळ देणारे चित्र रेखाटत आहेत. करोनाच्या या साथीला तोंड देण्यासाठी डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी जीव हातावर ठेवून दिवसरात्र काम करत आहेत. त्यांच्याविषयीचा आदरभाव व्यक्त करणारे पेटिंग राजस्थानमधील बिकानेर शहरात रेखाटण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य : पीटीआय)
-
करोना या संसर्गजन्य आजाराविषयी जनजागृती करणारी चेन्नई शहरात साकारलेली ही पेटिंग. (फोटो सौजन्य : पीटीआय)
-
करोनाविरोधातील या लढ्यात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या नर्सविषयी आदर व्यक्त करणारी आणि त्यांना प्रोत्साहीत करणारी अमेरिकेतील डल्लास शहरातील ही कलाकृती. (फोटो सौजन्य : AP)
-
करोनाचा प्रसार वेगानं होत असताना त्याला रोखण्यासाठी डॉक्टर नर्स आणि इतर कर्मचारी सुपरहिरोसारखं लढत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेणारी पोलंडमधील वॉरसॉ शहरात रेखाटली पेटिंग. (फोटो सौजन्य : AP)
-
ब्रिटनमधील परिस्थितीही करोनामुळे चिंताजनक आहे. (फोटो सौजन्य : AP)
-
इटली, अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन हे देश करोनाशी लढताना मेटाकुटीस आले आहेत. करोनाविषयी जागृती करणारी लंडन शहरात रेखाटण्यात आलेली कलाकृती. (फोटो सौजन्य : AP)
-
बेल्जियम शहरात कलाकारांनी अशा पद्धतीनं करोनाविरोधातील लढ्याविषयीचं चित्र रेखाटलं आहे. (फोटो सौजन्य : AP)
-
स्टार वॉर डिस्ने सीरिजमधील बेबी योद्धा या पात्रालाही मास्क घातलेली कलाकृती. (फोटो सौजन्य : AP)
-
रिओ दी जेनेरिओ शहरात भिंतीवर रेखाटण्यात आलेली ग्राफिटी. (फोटो सौजन्य : AP)
-
करोना प्रसार थांबवायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे मास्क. प्रत्येक कलाकृतीत मास्क वापरण्याचं आवाहन कलाकारांनी केलं आहे. (फोटो सौजन्य : Reuters)
-
व्हिएन्ना शहरात करोनापासून खबरदारी घेण्याविषयी साकारण्यात आलेलं पेटिंग. (फोटो सौजन्य : Reuters)
-
जर्मनीतील बर्लिन शहरात रेखाटण्यात आलेली ग्राफिटी. (फोटो सौजन्य : Reuters)
-
करोनाग्रस्त रुग्णांना मृत्यू्च्या दाढेतून परत आणणाऱ्या डॉक्टरांविषयी कृतज्ञभाव व्यक्त करणारी कलाकृती. (फोटो सौजन्य : AP)
-
देशातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविषयी आदर व्यक्त करणारे इंडोनेशियातील जकार्ता शहरात काढण्यात आलेलं पेटिंग. (फोटो सौजन्य : Reuters)
-
स्विझर्लंडमधील एका भिंतीवर काढण्यात आलेल्या कलाकृतीचा फोटो घेताना नागरिक. (फोटो सौजन्य : Reuters)
-
स्कॉटलंडमधील एका इमारतीच्या भिंतीवर काढण्यात आलेलं पेटिंग. (फोटो सौजन्य : AP)
-
घरीच रहा असं आवाहन करणारं टेक्सॉस शहरातील ही कलाकृती. (फोटो सौजन्य : AP)
-
करोनाचा संसर्ग होऊन मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या जगात एका लाखाच्या पुढे गेली आहे. त्यामुळे सर्वच देश नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करत आहेत. (फोटो सौजन्य : AP)
-
ग्राफिटी आर्टिस्ट जेफ सेंट यांनी रेखाटलेली कलाकृती. (फोटो सौजन्य : AP)
-
वॉशिग्टन शहरातील जॉर्ज वॉशिग्टन यांचं तोंडावर मास्क असलेली चित्र. (फोटो सौजन्य : Reuters)

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”