-
काही दिवसांपूर्वीच काबीनीच्या जंगलामधील बॅक पँथरचे फोटो व्हायलर झाले होते. आता सोशल मिडियावर आणखीन एका दुर्मिळ पाण्याचे फोटो व्हायरल होत आहे. हा प्राणी आहे 'गोल्डन टायगर.' आतापर्यं तुम्ही वाघ पाहिला असेल पण गोल्ड टायगर नक्कीच पाहिला नसेल कारण हा प्राणी या शतकामध्ये भारतात पहिल्यांदाच आढळून आल्याचा वादा केला जात आहे. इंडियन फॉरेस्ट सर्विसमधील आधिकारी प्रवीण कासवान यांनी ट्विटरवरुन हा फोटो शेअर केला आहे. (Photo: Mayuresh Hendre, Twitted By: twitter/ParveenKaswan)
-
गोल्डन टायगरला 'टेबी टायगर' किंवा 'स्ट्रॉबेरी टायगर' असंही म्हणतात. हा वाघ आसामच्या काझीरंगा अभयारण्यात आढळून आला आहे. हा देशात आढळलेला पहिला गोल्डन टायगर आहे. (Photo: Mayuresh Hendre, Twitted By: twitter/ParveenKaswan)
-
गोल्डन टायगरच्या अंगावर चॉकलेटी आणि गडद पिवळ्या रंगाच्या पट्ट्या असतात. हा वाघ याच रंगसंगतीमुळे बंगाल टायगरपेक्षा वेगळा दिसतो. बंगाल टायगरच्या अंगावर लाल आणि काळ्या रंगाच्या पट्ट्या असतात. (Photo: Mayuresh Hendre, Twitted By: twitter/ParveenKaswan)
-
कासवान यांनी गोल्डन टायगरला आपल्या कॅमेराच्या लेन्समध्ये मयुर हांड्रे या फोटोग्राफरने टिपल्याचेही नमूद केलं आहे. (Photo: Mayuresh Hendre, Twitted By: twitter/ParveenKaswan)
-
कासवान यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर एवढ्या सुंदर प्राण्याचे फोटो पाहून नेटकरी त्याच्या प्रेमात पडल्याचे कमेंटवरुन दिसून येत आहे. २२०० हून अधिक जणांनी हा फोटो शेअर केला असून १६ हजारहून अधिक जणांनी हा फोटो लाइक केला आहे. (Photo: Mayuresh Hendre, Twitted By: twitter/ParveenKaswan)
-
कासवान यांच्या एका फॉलोअरने रेडइटवरुन हा गोल्डन टायगर कसा दिसतो याचा एक क्लोजअप फोटो प्रतिक्रिया देताना पोस्ट केला आहे. हा फोटो युझरने रेडइटवरुन शोधल्याचे म्हटलं आहे. (Twitted By: Twitter/TheCrypticAnon)

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या घटनेमुळे दादरमध्ये तणाव; खासदार देसाई म्हणाले, “त्या भेकडांना…”