-
हनिमून म्हणजेच मधूचंद्रचा वेळ म्हणजे आराम करण्याचा वेळ. लग्नाच्या धावपळीनंतर निवांत काही क्षण आपल्या जोडीदाराबरोबर घालवत आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी हिनमून हवाच असं म्हटलं जातं. मात्र काही जण हे नेहमी हटके विचार करतात मग ते लग्न असो किंवा अगदी हनिमून असो. असाच वेगळा विचार करणं जोडपं म्हणजे अनुदीप हेगडे आणि मिनुषा कांचा.
-
लग्नानंतर हिनमूनला जाण्याऐवजी अनुदीप आणि मिनुषाने आपल्या मूळ गावीच थांबून हनिमून साजरा करण्याचा ठरवलं आणि तेही एकदम हटके स्टाइलने.
-
अनुदीप आणि मिनुषा या दोघांनी लग्न झाल्यानंतर आठवड्याभराने हनिमूनसाठी घेतलेल्या सुट्ट्यांमध्ये आपल्या मूळ गावी जाऊन समुद्रकिनाऱ्यांची साफसफाई करण्याचा निर्णय घेतला.
-
लग्नानंतर अनुदीप आणि मिनुषा कर्नाटकमधील बाईंदूर येथे गेले. हे अनुदीपचं गाव आहे.
-
बाईंदूर या आपल्या गावी केल्यानंतर त्यांचं अनेकदा येथे असणाऱ्या सोमेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर अनुदीप आणि मिनुषा या दोघांचं जाणं येणं व्हायचं.
-
समुद्रकिनाऱ्यावर बसून निवांत गप्पा मारताना अनुदीप आणि मिनुषाला एक गोष्ट सर्वाधिक खटकली. ती म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर येणारे लोकं वाटेल तिथे कचरा टाकायचे.
-
समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या लोकांनी समुद्रकिनाऱ्याचं जणू डम्पिंग ग्राउण्ड करुन टाकलं आहे असं या दोघांना वाटू लागलं.
-
समुद्रकिनाऱ्यावर पडलेल्या कचऱ्यामध्ये दारुच्या बाटल्या, चप्पला आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश असल्याचं त्यांना दिसलं.
-
त्यामुळे समुद्रकिनारी जाऊन हातात हात धरुन बसण्याऐवजी अनुदीप आणि मिनुषा या दोघांनी समुद्रकिनाऱ्याची साफसफाई करण्याचा निर्णय घेतला.
-
अनुदीपला समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहिम राबवण्याचा अनुभव पाठीशी होता. त्याचा चांगलाच फायदा या दोघांना झाला.
-
अनुदीप आणि मिनुषाने समुद्र किनारा साफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी यासाठी लागणाऱ्या काही मूळ गोष्टी विकत घेतल्या. यामध्ये ग्लोव्हज, कचऱ्याच्या पिशव्या, झाडू यासारख्या गोष्टींचा समावेश होता.
-
अनुदीप आणि मिनुषाच्या या मोहिमेमध्ये काही स्थानिकही सहभागी झाले.
-
या दोघांनी सुरु केलेल्या मोहिमेममध्ये २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान ८०० किलो कचरा गोळा झाला.
-
सुरुवातीचे काही दिवस आम्ही दोघेच हे काम करत होतो. मात्र आम्ही निराश झालो नाही, असं अनुदीप सांगतो.
-
आमचे काम पाहून काही दिवसांनी आम्हाला येथील स्थानिक तरुणांनी पाठिंबा देण्यास सुरुवात केले. ही तरुण मंडळीही समुद्रकिनारा साफ करण्याच्या मोहिमेममध्ये सहभागी झाली आणि आमचा एकच ग्रुपच तयार झाला, असंही अनुदीपने सांगितलं.
-
अनुदीप आणि त्याच्या टीमने जमा केलेला कचरा आता स्थानिक ग्रामपंचायत उचलून नेते. त्यामुळे कचरा जाळून त्याची विल्हेवाट लावावी लागत नाही.
-
अनुदीप आणि मिनुषाकडून स्थानिकांनी समुद्रकिनारे साफ ठेवण्याची प्रेरणा घेतली आहे. आता हे दोघे परतल्यानंतरही ही मोहीम सुरु ठेवण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतल्याचे समजते.
-
आम्ही दोघांनी सुरु केलेली मोहिम जनतेची झाली याचा आनंद आहे असं अनुदीपने एका इन्स्ताग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
अनुदीप आणि मिनुषाला समुद्रातील जिवांच्या संवर्धऩासंदर्भात आणि जैवविविधतेसंदर्भात जागृकता निर्माण करायची आहे.
-
अनुदीप आणि मिनुषा यापुढेही अशाप्रकारे समुद्रकिनाऱ्यांची साफसाफाई सुरु ठेवणार आहेत.
-
अनुदीप आणि मिनुषाप्रमाणे पर्यावरणाची काळजी करणारे लोकं सध्या खूप दूर्मिळ झालेत. त्यामुळेच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्याच्या पुढील मोहिमांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा… (सर्व फोटो : instagram/travel_nirvana वरुन साभार)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली