-
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे कायमच चर्चेत असतात. सोशल नेटवर्किंगवर ज्याप्रमाणे रोहित लोकप्रिय आहेत त्याहून प्रत्यक्षात ते त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहे. याच लोकप्रियतेची प्रचिती पुण्यामागील एका रुग्णालयाबाहेर आली. रोहित पवार, सेल्फी आणि मावशींचा हा प्रसंग सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
बीडचे उमेश मुळे यांनी पुण्यातील रुग्णालयाबाहेर घडलेला एक प्रसंग फेसबुक पोस्टमध्ये सांगितला असून ती सध्या व्हायरल होत आहे. झालं असं की काही कामानिमीत्त रोहित पवार पुण्यातील एका रूग्णालयामध्ये आले होते. काम झाल्यानंतर रोहित पुन्हा आपल्या गाडीतून नियोजीत ठिकाणी जात असताना, या रूग्णालयामध्ये रूग्णांची सेवा करणा-या मावशी त्यांना गेटजवळ भेटल्या.
-
या मावशींनी आवाज दिल्यानंतर रोहित पवार यांनी चालकाला गाडी थांबवायला सांगितली. रोहित पवार यांनी त्या मावशींची विचारपूस केली. त्यानंतर त्या मावशींनी रोहित पवार यांच्याकडे मला तुमच्याबरोबर सेल्फी काढायचा आहे अशी मागणी केली.
-
मावशींच्या या मागणीवर रोहित पवारांनी लगेच होकार दिला. मात्र मावशींनी मला सेल्फी काढता येत नाही तुम्हीच काढा असं सांगत रोहित पवार यांच्या हाती आपला मोबाईल दिला.
-
अचानक आपल्याला कोणीतरी आवाज देतं म्हणून फक्त काच खाली घेऊन हसण्यापेक्षा किंवा गाडीतून हात दाखवण्यापेक्षा गाडी थांबवायला सांगून समोरच्या व्यक्तीला दिलेला वेळ आणि सन्मान तुमच्यातल्या माणूसपणाचं दर्शन घडवून देतं हेच रोहित पवार यांच्या कृतीतून दिसून आल्याचं हा प्रसंग स्वत:च्या डोळ्याने पाहणाऱ्या मुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (सर्व फोटो फेसबुकवरुन साभार)

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…