-
जगभरात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. चाचण्या करण्यापासून ते क्वारंटाईन करण्यापर्यंत उपाययोजना केल्या जात आहेत. सर्व खबरदारी घेतली जात असताना एका प्रवाशाचा विमानातच मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या प्रवाशाला करोना झाला होता. मात्र, त्यानं ही माहिती लपवून ठेवली. या व्यक्तीला एका आठवड्यापासून करोनाचे लक्षणं होती. (प्रातिनिधिक छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)
-
या व्यक्तीला पदार्थांची चव आणि गंध येत नव्हता. माहितीप्रमाणे विमानाने उडाण करण्यापूर्वी या प्रवाशाचे पूर्ण शरीर थरथर कापत होते. त्याचबरोबर त्याला घामही सुटला होता. श्वास घेण्यासही त्रास जाणवू लागला होता. विमानाने उडाण केल्यानंतर या प्रवाशाची परिस्थिती आणि बिघडत गेली. न्यू ओरलियन्समध्ये विमानाचं तात्काळ लँडिंग करण्यात आलं होतं.
-
विमानानं उडाण केल्यानंतर एका तासाने या प्रवाशाने श्वास घेणं बंद केलं. त्यानंतर केबिन क्रूने पॅरामेडिक्सची मदत घेतली. यावेळी त्या प्रवाशाला वाचवण्याचे प्रयत्न केले गेले. मात्र, त्यांना प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आलं नाही.
-
पॅरामेडिक्स पथकाच्या टोनी एल्डापा यांनी ट्विट करून याची माहिती दिली. एक व्यक्ती जी करोनाग्रस्त असू शकतो. मी सीपीआरच्या मदतीने त्याचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले. त्यामध्ये मोठा धोका होता. त्या व्यक्तीच्या पत्नीकडे मेडिकल हिस्ट्रीविषयी चौकशी केली होती. मात्र, त्यांनी मयत प्रवासी करोना पॉझिटिव्ह नसल्याचं म्हटलं होतं. लॉस एंजलिसमध्ये गेल्यानंतर त्याची करोना चाचणी होणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, असं टोनी यांनी सांगितलं.
-
विमानातच प्रवाशाचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व प्रवाशी संपर्क करत आहेत. त्याचबरोबर विमानातील क्रू मेंबर्संना दोन आठवड्यासाठी आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपातकालीन परिस्थितीमुळे विमान न्यू ओरलिअन्समध्ये उतरवण्यात आलं आणि प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, असं विमान कंपनीकडून सांगण्यात आलं. (प्रातिनिधिक छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक