-
बाल्कानच्या नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगा या महिला भविष्यकाराने २०२१ संदर्भातील भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या सांगण्यानुसार मानवतेसाठी २०२१ हे धक्कादायक वर्ष ठरणार आहे. २०२० मध्ये करोनाने थैमान घातल्याने नवीन वर्षाकडे आशेने पाहणाऱ्यांसाठी बाबा वेंगा यांची भविष्यवाणी थोडी धक्का देणारीच आहे.
-
८६ वर्षीय बाबा वेंगा याचं खरं तर १९९६ सालीच निधन झालं आहे. मात्र त्यांनी सन ५०७९ पर्यंतचे भविष्य सांगून ठेवल्याचा दावा केला जातो. दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या भविष्यावाणीची चर्चा होते.
-
विशेष म्हणजे बाबा वेंगा यांनी अमेरिकेवर झालेल्या ९/११ चा दहशतवादी हल्ला, ब्रेक्झिटबरोबरच जगात घडलेल्या अनेक गोष्टींबद्दल अचूक भाष्य केलं आहे.
-
२०२१ सालाबद्दल बोलताना बाबा वेंगा यांनी जगभरामध्ये मोठ्याप्रमाणात प्रलयाच्या घटना घडतील. जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संकटं येतील असा इशाराही त्यांनी २०२१ संदर्भात दिला आहे. डेली मेल युकेने त्यांच्या या भविष्यवाणीसंदर्भात बातमी दिली आहे.
-
एक मोठा ड्रॅगन मानवतेवर ताबा मिळवेल, असं २०२१ बद्दल सांगताना म्हटलं आहे. काहींच्या मते हा मोठा ड्रॅगन म्हणजे चीन असल्याचे संकेत बाबा वेंगा यांनी दिलाय. तसेच या ड्रॅगनविरोधात तीन जायंट्स (मोठे) एकत्र येतील असंही बाबा वेंगा म्हणाल्या आहेत.
-
याचबरोबर बाबा वेंगा यांनी इंधनासंदर्भातील आपल्या भविष्यवाणीमध्ये सांगितलं आहे. पेट्रोलियम पदार्थांचे उत्पादन थांबल्यानंतर ट्रेन सूर्यप्रकाशाच्या मदतीने हवेत उडेल असा उल्लेख त्यांच्या भविष्यवाणीमध्ये सापडतो.
-
बाबा वेंगा यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचाही आपल्या भविष्यवाणीमध्ये उल्लेख केलाय.
-
ट्रम्प यांना एक रहस्यमय आजार होईल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. या आजारामुळे ट्रम्प यांची ऐकण्याची क्षमता कमी होऊन ते बहिरे होतील तसेच त्यांना ब्रेन हॅमरेज होईल असंही या भविष्यवाणीत सांगण्यात आलं आहे.
-
२०२० मध्ये ट्रम्प यांना एखादा नवा अजार होईल असं बाबा वेंगा यांनी सांगितलं होतं. ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष निवडणुकांच्याआधीच करोनाची लागण झाली आणि त्यामधून ते बरेही झाले.
-
तर २०२१ मध्ये पुतिन यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता बाबा वेंगा यांनी व्यक्त केलीय. पुतिन यांच्यावर त्यांच्याच देशातील कोणीतरी जीवघेणा हल्ला करेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.
-
तसेच युरोपवर इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला होण्याची भीतीही बाबा वेंगा यांनी व्यक्त केलीय.
-
बाबा वेंगा यांनी आजारांसंदर्भात केलेल्या भविष्यवाणीमुळे अनेकजण चिंतेत पडलेले असतानाच याच भविष्यवाणीत एक दिलासा देणारी बातमीही आहे.
-
२०२१ मध्ये जगाला कॅन्सरपासून मुक्ती मिळेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.
-
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार मानवाला २०२१ मध्ये कॅन्सवरील उपचारांचा शोध लागेल.
-
त्याचवेळेस बाबा वेंगा यांनी जगामध्ये तीन राक्षस एकत्र येतील असं सांगितलं आहे. मात्र याचा नक्की संदर्भ काय जोडता येईल यासंदर्भात तर्कवितर्क लावले जात आहेत.
-
यापूर्वी बाबा वेंगा यांनी सोव्हिएत युनियन तुटण्यासंदर्भात, प्रिंसेस डायनाचा मृत्यू, चर्नोबीलसारख्या घटनांची अचूक भविष्यवाणी केली होती.
-
विशेष म्हणेज बाबा वेंगा यांनी स्वत:च्या मृत्यूचीही भविष्यवाणी केली होती.
-
बाबा वेंगा या स्वत: अंध होत्या.
-
बाबा वेंगा भविष्य आणि औषधी वनस्पती या विषयांमध्ये विशेष रस होता.
-
बाबा वेंगा यांचं १२ व्या वर्षांपर्यंत आयुष्य अगदी सर्व सामान्य मुलीसारखं गेलं.
-
मात्र वयाच्या १२ व्या वर्षी एका वादळामध्ये त्यांना कायमचं अंधत्व आलं. त्या जेव्हा वादळानंतर त्यांच्या कुटुंबियांना सापडल्या तेव्हा त्यांचे डोळे शिवून घेतल्यासारखे झाले होते.
-
मात्र याच घटनेमुळे बाबा वेंगा यांना दिव्यदृष्टी मिळाल्याचा दावा केला जातो. यानंतर बाबा वेंगा यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि त्यांच्याकडे दैवीशक्ती असल्याचा विश्वास येथील स्थानिकांमध्ये निर्माण झाला.
-
बाबा वेंगा या कोणत्याही आजारी व्यक्तींना नीट करु शकतात अशी ख्याती पसरली.
-
बाबा वेंगा यांनी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र राजीव गांधी यांच्या मृत्यूसंदर्भातही भाकित केल्याचा दावा केला जातो.
-
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार सन ५०७९ मध्ये ब्रम्हांडाचा अंत होणार आहे.
-
मात्र बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवणारे जितके आहेत तितकाच याला विरोध करणारेही आहेत.
ते काहीही असलं तरी दर वर्षाच्या शेवटच्या आवड्यात बाबा वेंगा यांनी सांगितलेल्या भविष्याची जगभरात चर्चा होताना दिसते. (सर्व फोटो : एपी आणि सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

Mayuri Hagawane: “वैष्णवी गर्भवती असताना तिला…”, हगवणे कुटुंबाच्या छळाचा मोठ्या सुनेनं वाचला पाढा