-
वर्षअखेरीस करोनाची मगरमिठी सैल असल्याचं आशादायी चित्र असतानाच करोनाच्या नव्या प्रकाराने प्रत्येकालाच चिंताग्रस्त करुन टाकलं आहे. काही महिन्यापूर्वी ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळून आला होता. या प्रकाराचा प्रसाराचा वेग प्रचंड असल्याचं ब्रिटन सरकारनं म्हटलं होतं. त्यानंतर करोनाचा आणखी दुसरा प्रकारही ब्रिटनमध्ये आढळून आला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. मात्र, करोनाचा हा प्रकार १६ देशात पोहोचला असल्याचं समोर आलं आहे. (छायाचित्रं प्रातिनिधीक आहेत. छायाचित्र सौजन्य/Reuters)
-
ब्रिटन… करोनाचा हा नवीन प्रकार सर्वात आधी ब्रिटनमध्ये आढळून आला. नवीन प्रकाराने संक्रमित झालेला पहिला रुग्ण ब्रिटनमध्ये सप्टेंबर महिन्यात आढळून आला होता. त्यानंतर डिसेंबरच्या सुरूवातीला ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी सांगितलं होतं की, करोनाचा हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर गेला आहे. प्रसार थांबवण्यासाठी ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. (छायाचित्रं सौजन्य/indian express)
-
स्वीडन… या देशातही करोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. ब्रिटनमधून आलेल्या एका प्रवाशाला नवीन करोनाचं संक्रमण झाल्याचं चाचणीतून दिसून आलं आहे. या प्रवाशाला तातडीने विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. (छायाचित्रं सौजन्य/indian express)
-
फ्रान्स… फ्रान्समध्येही करोनाचा नवा स्ट्रेन अर्थात प्रकार आढळून आला आहे. ख्रिसमसच्या दिवशी हा रुग्ण आढळून आला. लंडनमधून परतलेल्या एका फ्रान्स नागरिकाला नवीन करोनाचं संक्रमण झाल्याचं निष्पन्न झालं. (छायाचित्रं सौजन्य/Reuters)
-
स्पेन… करोनाच्या नवीन प्रकाराचा संसर्ग झालेले चार रुग्ण स्पेनमध्ये आढळून आले आहेत. हे चौघेही अलिकडेच ब्रिटनमधून परतले आहेत. चौघांची प्रकृती गंभीर नसल्याचं स्पेन सरकारनं म्हटलं आहे. (छायाचित्रं सौजन्य/Reuters)
-
स्विझर्लंड… तीन लोकांना करोनाच्या नवीन प्रकाराचा संसर्ग झाल्याचं स्विझर्लंडच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. यापैकी दोघे ब्रिटनमध्ये वास्तव्याला आहेत आणि स्विझर्लंडमध्ये फिरण्यासाठी आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा आता आरोग्य विभागाकडून शोध घेतला जात आहे. (छायाचित्रं सौजन्य/indian express)
-
डेन्मार्क… करोनाच्या नवीन स्ट्रेनचे ९ रुग्ण डेन्मार्कमध्ये आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनंही याला दुजोरा दिला आहे. (छायाचित्रं सौजन्य/Reuters)
-
नेदरलँड… युरोपियन देशांमध्ये समावेश होणाऱ्या नेदरलँडमध्ये करोनाच्या नवा प्रकाराने शिरकाव केला आहे. दोन रुग्ण आढळून आले असल्याचं सरकारने म्हटलं आहे. (छायाचित्रं सौजन्य/AP)
-
जर्मनीमध्ये २० डिसेंबर रोजी एका महिलेला करोनाच्या नवीन प्रकाराचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. त्या महिलेला विलगीकरणात ठेवण्यात आलं असून, ती महिला लंडनहून परतली होती. (छायाचित्रं सौजन्य/AP)
-
ब्रिटनवरून रोममध्ये आलेल्या एका जोडप्याला करोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झाल्याचं चाचणीतून निष्पन्न झालं. त्यामुळे इटलीमध्येही करोनाच्या नव्या प्रकाराने शिरकाव केला आहे. या जोडप्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा आता शोध घेतला जात आहे. (छायाचित्रं सौजन्य/Reuters)
-
कॅनडामध्येही करोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. २६ डिसेंबर रोजी एका जोडप्यामध्ये करोनाचा नवीन विषाणू आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे या जोडप्याने कुठेही प्रवास केलेला नाही. त्याचबरोबर ते कुणाच्या संपर्कातही आले नव्हते. (छायाचित्रं सौजन्य/Reuters)
-
ख्रिसमसच्या दिवशी जपानमध्ये करोनाचा नवा विषाणू आढळून आला. जपानमध्ये पाच रुग्णांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे जपान सरकारने प्रवासी वाहतूक बंद केली आहे. करोना निगेटिव्ह रिपोर्ट असणाऱ्या नागरिकांनाच यापुढे जपानमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. (छायाचित्रं सौजन्य/AP)
-
लेबनॉनमध्येही २१ डिसेंबर रोजी करोनाचा नवीन प्रकार आढळून आला आहे. लंडनहून आलेल्या विमानामध्ये काही प्रवासी करोना पॉझिटिव्ह निघाले. त्यांची चाचणी केल्यानंतर करोनाच्या नवीन विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. (छायाचित्रं सौजन्य/AP)
-
सिंगापूरमध्ये करोनाच्या नवीन प्रकाराचा शिरकाव झाल्याची माहिती तेथील आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. २४ डिसेंबर रोजी याबद्दल माहिती देण्यात आली. एक व्यक्ती नवीन प्रकाराने बाधित असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. (छायाचित्रं सौजन्य/AP)
-
ऑस्ट्रेलियामध्ये दोन रुग्ण आढळून आले आहेत. न्यू साऊथ वेल्समध्ये हे रुग्ण आढळून आले आहेत. दोन्ही रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. (छायाचित्रं सौजन्य/AP)
-
दक्षिण आफ्रिकेत कार्यरत असलेल्या ब्रिटनमधील डॉक्टरांच्या पथकाला करोनाच्या नवीन प्रकाराचा संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आफ्रिकेत प्रवासावर बंधन आणण्यात आली आहेत. (छायाचित्रं सौजन्य/indian express)
-
ब्रिटन आणि अन्य युरोपियन देशांबरोबरच नायजेरियातही करोनाचा नवीन प्रकाराने पाऊल ठेवलं आहे. आफ्रिका सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशन या केंद्राचे प्रमुख जॉन केंगासॉग यांनी नवीन प्रकार आढळून आल्याची माहिती दिली आहे. मात्र, युरोपियन देशात आढळून आलेल्या विषाणूपेक्षा या करोनाचं स्वरूप वेगळं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (छायाचित्रं सौजन्य/AP)

कोणत्या राशींना नवीन कामाची सुरवात करण्यास उत्तम ठरेल दिवस? वाचा मेष ते मीनचे मंगळवारचे राशिभविष्य