-
माहिती तंत्रज्ञान श्रेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या मयक्रोसॉफ्टने दिल्ली-एनसीआरजवळच नोएडामधील आयडीसी म्हणजेच इंडिया डेव्हलपमेंट सेंटर सुरु केलं आहे.
-
या ऑफिससंदर्भात एक व्हिडीओही कंपनीने सोशल नेटवर्किंगवर शेअर केलाय. ज्यामध्ये हे ऑफिस कसं असणार आहे याची झलक दाखवण्यात आलीय.
-
आता तुम्ही म्हणाल की यामध्ये अगदी व्हिडीओ करुन ऑफिस दाखवण्यासारखं काय खास आहे या मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमध्ये.
-
अर्थात हे ऑफिस खास असल्यानेच कंपनीने हा व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये ऑफिसच्या इंटिरीयरपासून अनेक गोष्टींची माहिती दिली आहे. हे ऑफिस ९० हजार स्वेअर फूटांचं आहे.
-
हा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असून त्यामागील मुख्य कारण आहे या ऑफिसची थीम ताजमहाल अशी आहे.
-
नोएडामधील मायक्रोसॉफ्टचं हे ऑफिस बाहेरुन इतर ऑफिसेसप्रमाणे दिसत असलं तरी या ऑफिसचे आतमधील फोटो पाहून तुम्हालाही हे ऑफिस खास असल्याची खात्री पटेल. चला तर पाहुयात कसं आहे नक्की हे ऑफिस.
-
अगदी रिसेप्शनपासूनच हे ऑफिस वेगळं आहे याची चाहूल लागते. हा रिसेप्शन एरियाचा फोटो आहे.
-
ताजमहालप्रमाणेच ऑफिसमधील प्रत्येक दरवाजे आणि रचनेमध्ये किमानींना विशेष महत्व देण्यात आलं आहे.
-
ऑफिसमधील अनेक भिंतींवर नाजूक नक्षीकाम करण्यात आलेलं आहे.
-
ऑफिसची थिम ताजमहल असल्याने त्याची भव्यता पाहता क्षणी नजरेत भरते.
-
ऑफिसमध्ये अनेक ठिकाणी ताजमहालचे फोटो लावण्यात आलेत.
-
हे ऑफिसमध्ये आम्ही ताजमहाल बांधणाऱ्या कारागिरांनी दिलेली अनोखी आदरांजली आहे, असं कंपनीने म्हटलं आहे.
-
ताजची शैली वापरली असली तरी हे ऑफिस अत्याधुनिक आणि सर्व आधुनिक तंत्रज्ञान असणारंही कसं राहील याकडे कंपनीने खास लक्ष दिलं आहे.
-
सहा मजल्यांच्या इमारतीमधील तीन मजल्यांमध्ये हे मायक्रोसॉफ्टचं ऑफिस पसरलेलं आहे.
-
ही आहे ऑफिसमधील डेस्कची रचना.
-
ऑफिसमध्ये मुबलक प्रमाणात नैसर्गिक प्रकाश असेल अशी रचना करण्यात आली आहे.
-
डेस्कच नाही तर जिथे जिथे शक्य आहे तिने जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश ऑफिसमध्ये येईल अशी रचना करण्यात आलीय.
-
ऑफिसमधील डेस्क असणारा भाग वगळता इतर सर्व ठिकाणी भव्यता लगेच जाणवते.
-
इमारतीमधील लहान-मोठे हॉल पांढरा रंग आणि वेगळ्या रचनेमुळे अधिक भव्य वाटतात.
-
मोठ्या आकाराचे पॅसेज लगेच लक्ष वेधून घेतात.
-
ऑफिसमधील फर्निचरची निवडही ताज थीमवर आधारित या ऑफिसच्या रिचनेसला वाढवणारीच असेल याकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे.
-
ऑफिसच्या वेगवेगळ्या भागातील फर्निचरची रंगसंगती वेगवेगळी आहे.
-
अनेक ठिकाणी ताजचे लहान मोठे फोटो लावण्यात आलेत.
-
पॅसेजच्या बाजूला असणाऱ्या भिंतींजवळ अनेक ठिकाणी नाजूक नक्षीकाम करण्यात आलं आहे.
-
या नक्षी कामातील एक वैशिष्ट्य म्हणजे एका विशेष अँगलमधून पाहिल्यावर यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांची प्रतिकृती दिसते.
-
इतरही नक्षीकाम अगदी एखाद्या ऐतिहासिक स्मारकालाही लाजवेल इतकं सुंदर आहे.
-
ऑफीसमध्ये अगदी उत्तम पद्धतीने स्पेस मॅनेजमेंट करण्यात आली आहे.
-
हे ऑफिसमध्ये विविधतेत एकताचा संदेश देणारे आहे असं कंपनीने म्हटलं आहे.
-
ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी अनेक सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्यात. यामध्ये अगदी पूल टेबलचाही समावेश आहे.
-
गोल आकाराचे घुमटासारखे नक्षीकाम आणि रचना संपूर्ण ऑफिसमध्ये दिसून येते.
-
अनेक ठिकाणी नक्षीकाम करताना त्याला ताज थीम शोभून दिसेल याची काळजी घेण्यात आलीय.
-
खास हाताने बनवलेली काही ताजची चित्र या ऑफिसमध्ये लावण्यात आली आहेत.
-
ताजमहाल कसा आहे हे अगदी साध्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न या चित्रात करण्यात आलाय.
-
अनेक बारीकसारीक गोष्टींकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे. हा फोटो याच ऑफिसमध्ये ठेवण्यात आलेल्या कुंड्यांमधील झाडांचे सौंदर्य वाढवण्यासाठी केलेलं प्रयत्न दाखवतो.
-
व्हिडीओच्या शेवटच्या काही सेकंदांमध्ये कंपनीने हे ऑफिस केवळ सुरुवात असून येणारा काळ हा अधिक आशादायी असल्याचं म्हटलं आहे.
-
कंपनीने शेअर केलेल्या व्हिडीओच्या शेवटीही ताजमहालचा हा फोटो देण्यात आलाय.
-
सोशल नेटवर्किंगवर या ऑफिसचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले असून अनेकांनी मायक्रोसॉफ्टकडे नोकरी आहे का अशी चौकशी केलीय. तर काहींनी काहीही करा पण मला इथं नोकरी द्या अशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
-
मी माझ्या भावाला सांगितलं होतं कंपनी सोडू नको. आता हा व्हिडीओ पाहून मी हसतेय आणि तो रडतोय, असं एका मुलीने म्हटलं आहे.
-
कसलं भारी आहे हे अशी प्रतिक्रिया तर अनेकांनी दिल्याचे पहायला मिळत आहे.
-
यांना आपला सीव्ही पाठवा आणि नुसतं प्लिज मला नोकरीवर घ्या एवढचं लिहा असं एकाने गंमतीने म्हटलं आहे.
-
हे ऑफिस नाही सेव्हन स्टार हॉटेल वाटत आहे, अशी प्रतिक्रिया एका महिलेने दिलीय.
-
इथे काम करायला कोणाला आवडणार नाही असा प्रश्नही काही नेटकऱ्यांनी विचारलाय.
-
मला कोणी पुन्हा दिल्लीत बोलवू शकतं तर ते हे ऑफिस आहे, असं एकाने म्हटलं आहे.
-
एखाद्या हॉटेललाही लाजवेल अशी रचना आहे या ऑफिसची असं मत व्यक्त करणारी ही प्रतिक्रिया.
-
अनेकांनी ऑफिसचे फोटो आणि व्हिडीओ पाहून ट्विटरवरुनच कंपनीमध्ये नोकरभरती सुरु आहे का अशी चौकशी केलीय. (सर्व फोटो : मायक्रोसॉफ्टच्या सोशल नेटवर्कींग अकाऊंटवरुन आणि ट्विटरवरुन साभार)

ना मॉम, ना मम्मी…; परदेशात राहूनही जपले मराठी संस्कार! माधुरी दीक्षितची मुलं तिला ‘या’ नावाने मारतात हाक, पाहा फोटो