-
फेब्रुवारी उजाडला की, सगळीकडे गुलाबी गुलाबी वातावरण होऊन जातं. तरुणाईला वेध लागतात ते व्हॅलेंटाईन डे चे आवडणाऱ्या व्यक्तीसमोर मनातील भावना व्यक्त करण्यासाठी अनेक जण खास या दिवसाची वाट बघतात. अनेकांची निराशा होते, तर काही जणांच्या प्रेम कहाण्यांना सुरूवात होते. अशाच काही खास लव्ह जोडप्यांविषयी… (छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)
-
पहिली प्रेम कहाणी आहे, देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची. भारतीय राजकारणात इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांची लव्हस्टोरी चर्चेत राहिली. १९३०मध्ये दोघांची भेट झाली होती. इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरू या एकदा आंदोलन करताना बेशुद्ध पडल्या होत्या. त्यावेळी फिरोज यांनी मदत केली होती. त्यानंतर ते त्यांच्या घरी विचारपूस करण्यासाठी अधूनमधून यायचे. याच काळात इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्यातील मैत्री वाढत गेली. दोघांनी १९४२ मध्ये लग्न केलं होतं.
-
शाहरुख खान आणि गौरी… बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेल्या शाहरूख खानची लव्हस्टोरीही हटके आणि मनात घरं करणारी आहे. १९८४ मध्ये शाहरूख पहिल्यांदा गौरीला भेटला होता. त्यानंतर दोघांच्या प्रेमात असंख्य अडथळे आले. पण, शेवटची दोघेही कायमचे एकमेकांचे झाले. पंजाबी ब्राह्मण असलेल्या गौरीच्या घरी शाकाहारी वातावरण होतं. त्यामुळे तिच्या घरचे या नात्याच्या विरोधात होते. गौरीनं शाहरूखला घरच्यांशी ओळख करून देताना तो हिंदू असल्याचं सांगितलं होतं. अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर दोघांनाही कुटुंबियांचं मन वळण्यात यश आलं आणि त्यानंतर १९९१मध्ये दोघांनी लग्न केलं.
-
सचिन तेंडूलकर आणि अंजली… क्रिकेट म्हटलं की सचिनचं नाव येणार नाही असं होत नाही. सचिनच्या मैदानातील विक्रमांची जशी नेहमीच चर्चा होते, तशीच त्याच्या लव्हस्टोरीचीही होतेच. सचिन आणि अंजलीची पहिली भेट मुंबई विमानतळावर झाली होती. दोघांनी फक्त एकमेकांना बघितलं होतं. त्यानंतर दोघे कॉमन फ्रेडच्या घरी भेटले होते. दोघंही पाच वर्ष एकमेकांना डेट करत होते. दोघांनी १९९५मध्ये लग्न केलं.
-
सोनिया गांधी व राजीव गांधी… गांधी कुटुंबातील ही दुसरी आणि खूप चर्चेत राहणारी लव्हस्टोरी. सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांची पहिली भेट झाली ती कॅब्रिज विद्यापाठात. सोनिया गांधी शिकत असतानाच एका रेस्टॉरंटमध्ये पार्टटाईम काम करायच्या. तिथेच राजीव गांधी यांना सोनिया गांधी आवडल्या होत्या, असं किस्सा आहे. त्यानंतर दोघांनी १९६८ मध्ये लग्न केलं. सोनिया गांधी भारतात आल्या. पुढे त्यांनी काँग्रेससाठी उभारणी देण्याचं कामही केलं.
-
सौरव गांगुली व डोना… सौरव गांगुली व डोना गांगुली यांची प्रेमकहाणी एखाद्या सिनेमाच्या स्क्रिप्टसारखीच आहे. सौरव गांगुली आणि डोना शेजारी राहायचे. लहानपणापासूनच दोघे एकमेकांचे मित्र होते. इंग्लडमध्ये पहिली कसोटी मालिका खेळायला जाण्यापूर्वी गांगुलीने डोनाला प्रपोज केलं होतं. दोघांच्या कुटुंबातील लोकांचा या नात्याला विरोध होता. मात्र, तरीही दोघांनी १२ ऑगस्ट १९९६ रोजी नोंदणी विवाह केला होता. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनीही त्यांचं नातं स्वीकारलं. त्यानंतर २१ फेब्रुवारी १९९७ रोजी पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाह झाला.
-
रोहित शर्मा रितिका… भारतीय संघाचा सलामीचा फंलदाज मुंबईकर रोहित शर्मा आणि रितिका स्टोरीही बरीच रोमँटिक आहे. रोहित शर्मा आणि रितिकाची लव्हस्टोरीची सुरूवात मजेशीर झालेली आहे. रितिका पूर्वी रोहित शर्माची मॅनेजर होती. तेथूनच दोघांमध्ये एकमेकांविषयी प्रेमभावना फुलून आली. दोघेही सहा वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. दोघांमध्ये आधी मैत्री झाली नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सहा वर्ष एकमेकाना डेट केल्यानंतर रोहितने रितिकाला प्रपोज केलं. बोरिवलीतील स्पोटर्स क्लबमध्ये रोहितने तिला प्रपोज केलं होतं. त्यानंतर २०१५मध्ये दोघे विवाहबद्ध झाले.
-
लव्हस्टोरीची चर्चा होतेय आणि एम.एस. धोनीचं नाव येणार नाही, अस होऊच शकत नाही. भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी यांच्या लव्हस्टोरीचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. धोनी आणि साक्षीची पहिली भेट भारत-पाकिस्तान यांच्यातील मालिकेदरम्यान कोलकात्यामध्ये झाली होती. त्यावेळी साक्षी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत होती. तेव्हापासून दोघांमध्ये प्रेम फुलायला सुरूवात झाली. त्यानंतर ४ जुलै २०१० रोजी धोनीने साक्षीसोबत विवाह केला.
-
अखिलेश यादव आणि डिंपल… उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांची लव्हस्टोरी साधी असली, तरी चर्चा भरपूर होते. ऑस्ट्रेलियातून शिक्षण घेऊन परतल्यानंतर अखिलेश यांची भेट डिंपल यांच्याशी झाली होती. त्यावेळी अखिलेश यांचं वय २५ वर्ष, तर डिंपल २१ वर्षांच्या होत्या. पण, मुलायम सिंह यादवांच्या या नात्याला विरोध होता. अखिलेश आपल्या भूमिकेवर ठाम होते. या प्रकरणात अमर सिंह यांनी मुलायम सिंह यांची समजूत घातली होती, असाही एक किस्सा आहे. त्यानंतर दोघांनी १९९९ मध्ये विवाह केला होता.
-
सैफ अली खान आणि करीना… तसं बघितलं तर सैफ अली खान आणि करीना कपूरच्या वयात दहा वर्षांचं अंतर आहे. करीनाच्या प्रेमात पडण्यापूर्वी सैफचं अमृता सिंहसोबत १९९१मध्ये लग्न झालेलं होतं. दोघे २००४मध्ये वेगळे झाले. त्यानंतर करीना आणि सैफ एकमेकांच्या जवळ आले. २००७ पासून दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या नात्याची चर्चाही व्हायची. पुढे १६ ऑक्टोबर २०१६ मध्ये करीनाने सैफसोबत लग्न केलं.

CJI B.R Gavai: भटक्या कुत्र्यांविरोधातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देशभरातून नाराजी; सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणाले, “मी…”